येनक – येणाडी चौफुलीवर भाजपच्या रास्तारोको आंदोलनाला यश
संबंधित अधिकाऱ्यांनी दिले अतिशीग्र गतीने समस्या सोडविण्याचे आश्वासन
लेखी करारनाम्याने आंदोलन मागे
सुरेंद्र इखारे वणी:- साखर ते शिंदोला प्रमुख जिल्हामार्ग वेकोलीने भार क्षमतेनुसार नवीन सिमेंट रस्ता बांधण्याकरिता कोळसा वाहतूक रास्तारोको आंदोलन येनक-येणाडी चौफुलीवर विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनाला यश . या आंदोलनात संबंधित क्षेत्राचे अधिकारी संपूर्ण अधिकारी उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, अधीक्षक अभियंता संभाजी धोतरे, परिवहन वाहतूक निरीक्षक पेन्सिलवार साहेब, महाप्रबंधक वणी एरिया अभासचंद्र सिंग, क्षेत्रीय योजना अधिकारी गिल साहेब, उपक्षेत्र प्रबंधक तलकल साहेब, पोलीस निरीक्षक गजानन करेवाड , माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, भाजप नेते दिनकर पावडे, रमेश राजूरकर या मान्यवरांचे उपस्थितीत निवेदनातील सहाही मुद्दे मान्य केले व अतिशीग्र गतीने समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. यामध्ये साखरा शिंदोला रस्ता उद्यापासून रस्ता समतल करून जीएसबी वापरून वायब्रेटर रॉलरने दबाई करून रस्ता वाहतूक योग्य काम सुरू करण्यात येईल असे वेकोलीने मान्य केले असून 49 लाख पेक्षाही जास्त रक्कम खर्च करणार, शिंदोला ते साखरा नवीन सिमेंट कोंक्रेट रस्ता बांधकाम सा बा विभाग वणी हे तीन दिवसात 50 टन भार क्षमतेला अधीन राहून अंदाजपत्रक वेकोलीला सादर करून 10 मीटर रुंद सादर केल्यावर 15 ऑगस्ट पर्यंत अंदाजपत्रकापैकी 30 टक्के रक्कम वेकोली सा बा विभागास जमा करून सिमेंट रस्ता बांधकाम प्रक्रिया सुरू होईल, कोळसा वाहतूक ताडपत्री झाकून नियमानुसार करणे व कोळसा गाडीमागे चारही बाजूने मोठ्या अक्षरात गाडी क्रमांक लिहिण्यात येईल, परप्रांतीय कोळसा वाहतूक वाहन चालकाचे पोलीस व्हेरिफिकेशन नेत्र तपासणी आणि कोळसा वाहन चालकाला जवळ आधार किंवा ओळखपत्र सोबत ठेवण्याचे मान्य केले, कोळसा प्रदूषणाने रस्त्यालगत नुकसान होणाऱ्या शेतपिकाची कृषी विभागाकडून सर्व्हे करून भरपाई बाबत विचार करण्यात येईल, शिंदोला ते साखरा एमडीआर शिंदोला शिरपूर घुगूस रेल्वेसायडिंग येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या अनियंत्रित वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी आरटीओ विभागाचे पेन्सिलवार साहेब व लोणी साहेब यांनी ऑगस्ट महिन्यापासून दोन वेळा स्पीडगण लावून वेगमर्यादा तपासून कारवाई करण्यात येईल असे उपस्थित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले व मान्यवरांनी करारनाम्यावर सह्या केल्या त्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले