23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

बसपातर्फे नामांतर शहिदांना अभिवादन

बसपातर्फे नामांतर शहिदांना अभिवादन

“कही हम भूल न जाये ” अभियान

नागपूर जयंत साठे:- मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी झालेल्या राज्यभरातील आंदोलनात 27 भीमसैनिक शहीद झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ नागपुरात बांधण्यात आलेल्या नामांतर शहिद स्मारकाला आज 4 ऑगस्ट या नामांतर शहीद दिनी बसपाने अभिवादन केले.

आज पासून 45 वर्षांपूर्वी 27 जुलै 1978 ला महाराष्ट्राच्या विधानसभेत व विधान परिषदेत एक मतांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव पास झाला. त्यामुळे मराठवाड्यातील जातीयवाद्यांनी दलितांची घरे जाळली. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी नागपुरात 4 आगस्ट 1978 ला एक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा संपल्यावर इंदोरा परिसरातील दहा नंबर पुलावर परत येणाऱ्या मोर्चेकर्‍यावर शरद पवार सरकारच्या पोलिसांनी बेछुट गोळीबार करून 5 लोकांचे मुडदे पाडले होते. त्याच ठिकाणी नागपूर मनपाद्वारे नामांतर शहीद स्मारक उभारण्यात आले.

फुले -शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या स्मारकाला दरवर्षी 4 आगस्ट व 14 जानेवारीला मोठ्या संख्येने भेट देऊन अभिवादन करीत असतात.

कही हम भूल न जाये या बसपाच्या अभियानांतर्गत आज बसपा चे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात बसपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या सरकारला शहीद करून निळ्या झेंड्याचे सरकार स्थापन करण्याची शपथ घेतली.

याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव पृथ्वीराज शेंडे, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, माजी नागपूर जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी मनपा पक्षनेता गौतम पाटील, माजी आशीनगर झोन सभापती वीरंका भिवगडे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, योगेश लांजेवार, सदानंद जामगडे, वामन सोमकुवर, गौतम गेडाम, सुबोध साखरे, बुद्धम राऊत, नितीन वंजारी, भगवान शेंडे, विनोद नारनवरे, अशोक धोंगडे, तपेश पाटील आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News