23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

गणेशपूर, चिलई ते तेजापूर रस्त्याची जीवघेणी अवस्था

गणेशपूर, चिलई ते तेजापूर रस्त्याची जीवघेणी अवस्था  

* लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष* शासनाचे बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत*

गावकरी त्रस्त*        

सुरेंद्र इखारे  वणी-  तालुक्यातील गणेशपूर, चिलई ते तेजापूर  या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली नागरिकांना वाट काढणे मुस्किल झाले असून अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता बळावली आहे.     संपूर्ण रस्त्याच्या कामात चक्क मुरूमएवजी लालमाती टाकून रस्त्याची दबाई केल्यामुळे या पावसाच्या दिवसात रस्ता उखडून पार वाट लागून गेली आहे. या रस्त्याचे निकृष्ठ बांधकाम असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या जागोजागी दोनदोन व चार चार फुटांचे मोठे पसरट खड्डे पडल्यामुळे ये जा करणार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.      या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात ओव्हरलोड वाहतूक असून त्या रस्त्याची वाट लागून पायवाट झाली आहे.या रस्त्यावर चार कँपन्यांचा हैदोस असून दररोज ट्रॅक फसून रस्ते जाम होत आहे. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी,शेतमजूर व वयोवृद्ध नागरिक पायदळ जात असल्याने त्यांच्या दैनंदिन कामामध्ये हा रस्ता अडसर बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना अपंगत्व येऊन काहींचा जीव सुद्धा गेला आहे याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  तेव्हा या रस्त्याकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे. तसेच परिसरातील नागरिक भयभीत आहे कारण आजारी व्यक्तीला उपचारासाठी कसे न्यायचे अशा विचारात नागरिक आहे. तेव्हा या मार्गावर असलेल्या ईशान कॅलसी, सुर्यकेम, एक्सलो फिनली प्रायव्हेट लिमिटेड चिलई, या सारख्या कँपन्यांचा त्रास येथील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना होत आहे तरीही  या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीं हेतुपुरस्सर पणे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. तेव्हा कुंभकर्णी झोपेत असणाऱ्या शासनाच्या बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे. या रस्त्याने शाळकरी मुले सायकलने ये जा करीत असताना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यात कधी अपघात होऊन जीव गमवावा लागेल हे काहीही सांगता येत नाही तरी देखील शासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही तेव्हा शासनाच्या कुंभकर्णी झोप घेणाऱ्या बांधकाम विभागाने जागे होऊन कमीतकमी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी त्रस्त गावकऱ्यांनी केली आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News