मनोहर भिडेच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर वणीत क्रांती मोर्चा
एसडीओना दिले निवेदन
सुरेंद्र इखारे वणी :- महात्मा फुले यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मनोहर भिडे यांचे वर कारवाई करण्याबाबतचे निवेदन समीर लेनगुळे व प्रमोद निकुरे यांचे नेतृत्वात देण्यात आले. दिनांक:२७/जुलै/२०२३ रोजी मनोहर भिडे यांनी अमरावतीच्या सभेत क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना इंग्रजांचे भडवे (चाकर) असे हेतुपुरस्सर विधान केले, मुळांत या आधी देखील मनोहर भिडे यांनी महात्मा फुले यांना देशद्रोही म्हणण्याचे महापाप केले.अनेक महाराष्ट्रातील महापुरुषांना बदनाम करण्याचे काम हा व्यक्ती करतो आहे. महात्मा फुले सारख्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांना जर हा व्यक्ती अश्लील भाषा वापरत असेल व अनेक शहरांमध्ये खुलेआम सभा घेत फिरत असेल,तर याला लोकप्रतिनिधीचा तर अभय नाही ना?
हा प्रश्न सामान्य जनतेला, चळवळीत लोकांना पडतो आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.कारण हा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये दंगलमय वातावरण तयार करतो आहे.
मनोहर भिडे यांनी जे महात्मा फुले व इतरही महापुरुष यांच्यावर विधान केले त्यामुळे समस्त माळी समाज तथा बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आले, या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी असे लोकमत तयार झालेले आहे,त्यामुळे प्रशासनाने व शासनाने या व्यक्तीच्या कार्यक्रमावर तात्काळ बंदी घालावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी क्रांती मोर्चा काढून निवेदनातून केली आहे . संबंधित निवेदनाच्या प्रति मा.जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ
मा.मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)
मा.गृहमंत्री (महाराष्ट्र राज्य) याना पाठविण्यात आले आहे. यावेळी समीर लेनगुळे, प्रमोद निकुरे, महेश चौधरी, आकाश म्हाडुळे, बंटी शेंडे, सूरज शेंडे, राहुल गुरनुले, भूषण लोनबळे, सूरज गुरनुले, विलास कोटरंगे, महादेव मोहूर्ले, गोपाळ वाढावी, समीर गुरनुले, मनोज गुरनुले, सागर बोरूले, आदर्श लोनबळे, जगदीश नुकूडे, ब्रह्म शेंडे, अक्षय मोहूर्ले, प्रवीण निकोडे, विनोद आदे उपस्थित होते.