श्रीराम वैरागडे गुरुजी यांचे पुण्यस्मरण
अशोक लोनगाडगे मारेगाव -: मारेगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत श्रीराम वैरागडे यांचा आज 6आगस्ट 23 ला 2 रे पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मालेगाव शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित राहतील व त्यांच्या ह्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील असे आयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे. या सोहळ्याला उपस्थित रहावे अशी विनंती पत्रकार
नरेंद्र वैरागडे यांनी केली आहे.