25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

गोर गरीब कलावंतांच्या प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यास महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती कटीबध्द – सोमनाथ गायकवाड,

गोर गरीब कलावंतांच्या प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यास महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती कटीबध्द
सोमनाथ गायकवाड,

जयंत साठे नागपूर:: गोरगरीब कलावंतांच्या प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यास महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती कटीबद्ध आहे असे प्रतिपादन सोमनाथ गायकवाड यांनी केले. महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचा विदर्भ स्तरीय दिशादर्शक कलावंत मेळावा दि.06 ऑगष्ट रोजी नागपूर येथे ऊरवेला काॅलनी स्थित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह मधे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.        मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माणिकरावजी खोब्रागडे ,ऊदघाटक महाराष्ट्र कास्ट्राईब कामगार संघटनेचे अध्यक्ष अरूण गाडे उपस्थित होते.तर मेळाव्याला कलावंत समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड, प्रदेश महासचिव ॲड.श्याम खंडारे, ह्यांनी संबोधीत केले.
ह्या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात सोमनाथ दादा गायकवाड ह्यांनी समितीच्या गेल्या तिन वर्षातील कार्याचे सिंहावलोकन केले,
महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील गावखेड्यापर्यंत कलावंत समिती पोहोचविण्याचे,गोरगरीब कलावंताचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे,तथा दिलासा मिळवून देण्यासाठी रस्त्यावर ऊतरून आंदोलने ,मोर्चे,निवदने ई.न्यायीक मार्गाने लढा देण्याचे कार्य केले .कोरोना कालावधीत कलावंत मरणाच्या दारात ऊभा असतांना प्रत्येक जिल्ह्यातील समितीच्या पदाधिका-यांच्या सहकार्याने अन्नधान्याच्या किटस चे वाटप केलेत. शासनाने कलावंताना तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे ही मागणी लावून धरली व राज्यातील 56 हजार एकल कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रूपयाचे अर्थसहाय्य मिळवून देण्यात समितीला यश आले.,राज्याचे सांस्कृतिक मंत्री,ना.सूधीर भाऊ मूनगंटीवार ,तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान ऊपमूख्यमंत्री नाअजितदादा पवार सोबत मंत्रालयात शिष्टमंडळासह चर्चा केली ,कलावंताच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता कलावंत आर्थिक विकास मंडळ गठीत करावे, वृध्द कलावंतांच्या शासकीय समित्या रखडलेल्या असल्याने हजारो कलावंताचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत ते तातडीने मंजूर करावे,वृध्द कलावंताच्या मानधनात वाढ करून किमान पाच हजार रूपये करावे,जिल्हानिहाय वार्षीक मानधन देण्याच्या ईष्टांकात दूप्पटीने वाढ करावी,वृध्द कलावंत शासकीय समितीवर कलावंत समितीचे तज्ञ सदस्याची नियूक्ती करावी, बेघर कलावंतांना घरकूल मंजूर करावे,एस टी बस मधे मोफत प्रवास सेवा सवलत द्यावी,साहित्य संम्मेलनाच्या धर्तीवर जिल्हास्तरावर कलावंत महोत्सवाचे आयोजन शासना मार्फत करावे.ई.प्रमूख मागण्यासह ईतर महत्वपूर्ण मागण्यावर चर्चा झाली,ह्या सर्व मागण्यांवर सकारात्मक धोरण घेवून लवकरच निर्णय घेणार असल्याचे मान्य केले. निरपराध वारक-यांवर पोलीसांनी केलेला अमाणूष लाठीचार्ज हा कलावंत अस्मितेवरील हल्ला असल्याने ह्या घटनेचा निषेध नोंदवून प्रत्येक जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देवून तिव्र संवेदना शासनाला कळविण्याचे प्रभावी कार्य केले.
राज्यात किमान पाच लाख सदस्य नोंदणीचे ऊद्दीष्ट गाठण्याचे लक्ष असून त्यासाठी तालूका स्तरावर मेळावे घेवून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा समितीचा संकल्प असल्याचे त्यांनी सागीतले.कलावंताचे प्रश्न सूटले नाही तर नागपूर येथे येत्या हिवाळी अधिवेशनावर विशाल मोर्चाचे आयोजन करणार अशी घोषणा केली.
ॲड.श्याम खंडारे,सारीकाताई ऊराडे,समितीचे ऊपाध्यक्ष तथा अभिनेते रमेश जाधव, अरविंद पाटील, प्रतिभा पाटील,शालीक जिल्हेकर, ई.मान्यवराचे समयोचित मार्गदर्शन झाले ,विदर्भ प्रमूख मनोहर शहारे ह्यानी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सुनंदा गायकवाड, प्रास्ताविक जयंत साठे, तर आभार सारिकाताई उराडे यांनी मानले. यावेळी झाडीपट्टीतील अनेक कलावंताचा प्रवेश व सत्कार करण्यात आला.ऊपस्थित कलावंताना सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक,जिल्हा प्रमूख व त्यांचे सहका-यानी अथक परीश्रम घेतले.मेळाव्याला विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातून मोठ्या संख्येनी कलावंत ऊपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News