23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

या उपक्रमाशी नेहमीसाठी जुळून राहील असा विश्वास दिला- सौ सिमाताई चोरडिया

या उपक्रमाशी नेहमीसाठी जुळून राहील असा विश्वास दिला- सौ सिमा चोरडिया  

चिमुकल्यात आनंदोत्सव     

सुरेंद्र इखारे वणी :-   येथील नगर परिषद शाळा क्रमांक 9 क्रांतिवीर बिरसा मुंडा येथे मागील वर्षांपासून मा विजयभाऊ चोरडिया यांनी शैक्षणिक पालकत्व या उपक्रमातून नगर परिष शाळा क्रमांक 9 च्या सर्व शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याने दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.        यावर्षी  2023-2024 या शैक्षणिक सत्रात क्रांतिवीर बिरसा मुंडा येथील 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिखलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच्या सौ रुपाली कातकडे ह्या होत्या. प्रमुख अतिथी सौ सीमाताई विजय चोरडिया, ऍड सौ ख्यातिताई कुणाल चोरडिया, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दुर्गा गोवर्धन, मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच सौ रुपाली कातकडे यांचा सौ सीमाताई चोरडिया यांचे हस्ते शाल,श्रीफळ,  देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना बॅग, नोटबुक, शूज, सौक्स, टाय, बेल्ट, या साहित्याचे वाटप केले. यावेळी चिमुकल्यात उत्साह व आनंद दिसून आला हे पाहून चोरडिया परिवाराने समाधान व्यक्त केले. व या उपक्रमाशी नेहमीसाठी जुळून राहीन असा विश्वास चोरडिया परिवारानी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ वेणूताई कोटरंगे यांनी मानले. 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News