*पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे विचार गावोगावी पोहोचले पाहिजे यासाठी समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे……. – दत्तात्रेय कवितके (उपजिल्हाधिकारी पुणे)
प्रकाश भैय्या सोनसळे बीड प्रतिनिधी :- आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दत्तात्रेय कवितके साहेब उपजिल्हाधिकारी पुणे व विष्णु पारखे सर शिक्षक भारती संघटना बीड जिल्हा उपाध्यक्ष यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
आज बीड येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते.
दर रविवारी प्रकाश भैय्या सोनसळे हे अनेक दिवसापासून मान्यवरांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते ही आनंदाची बातमी आहे. यासाठी समाज बांधवांनी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे व जनजागृतीसाठी समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जागा केला पाहिजे यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे असे पुणे उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके साहेब यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करते वेळेस सांगितले.
यावेळी फुले साहेब, नारायण भोंडवे जिल्हाध्यक्ष,विलास महानवर, विठ्ठल कोकाटे, सूर्यकांत कोकाटे, सुधाकर वैद्य,लिंबाजी महारनोर, चादर सर, शिवाजी चांगण, शिंदे साहेब,जिजा शिंदे,संपत करे, किशोर सोळुंके युवा उद्योजक, अशोक क्षीरसागर आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.