Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorizedभिलगाव येथील शाळेत संगणक व ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण अभ्यासात रुची निर्माण...

भिलगाव येथील शाळेत संगणक व ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण अभ्यासात रुची निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम

भिलगाव येथील शाळेत संगणक व ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण
अभ्यासात रुची निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम
नागपूर ( जयंत साठे ): –   भिलगाव येथील शाळेत संगणक व ओव्हरहेड प्रोजेक्टर असल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे सुलभ झाले आहे. संगणक व ओव्हर हेड प्रोजेक्टर मुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होत असल्याचे दिसत आहे. आमच्या प्रतिनिधीने या शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता अत्यंत सुखद चित्र दिसून आले.
भिलगाव येथे जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा असून या शाळेत इयत्ता एक ते सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत एक मुख्याध्यापिका व तीन शिक्षक असून 72 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता आठवी पासून येथील विद्यार्थी नागपूर किंवा खाजगी शाळेत प्रवेश घेताना दिसतात. या शाळेमध्ये अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना समोर आणण्यासाठी सेतू उपक्रम राबविला जात असल्याचे आढळले .तसेच विविध उपक्रमांतर्गत शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. आतापर्यंत या शाळेत चार शाळाबाह्य मुलांना प्रवेश दिल्याचे दिसून आले. हे विद्यार्थी पूर्वी आपल्या आई-वडिलांसोबत वीट भट्ट्यावर उपस्थित राहत होते. त्यांना आता अभ्यासात हळूहळू आवड निर्माण होत आहे. क्षमता प्राप्त केले नसलेल्या विद्यार्थ्यांचा गट बनवून त्यांच्या क्षमता उंचावल्या जातात व अशा तऱ्हेने दिशा हा उपक्रम राबविला जात असल्याचे मुख्याध्यापिका कमल लाड यांनी सांगितले. या शाळेच्या पाच खोल्या असून त्या अत्यंत देखण्या आहेत. शालेय वातावरण शिस्तबद्ध असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स बेंचची व्यवस्था केलेली आहे. तसेच भिलगाव येथे एक अंगणवाडी असून या अंगणवाडीतही लहान बालकांना योग्य ते शिक्षण दिले जात असल्याचे दिसून आले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments