बुक बँक शुभारंभ व वृक्षारोपण करून स्माईल फाऊंडेशन संस्थेचा 3 रा वर्धापन दिवस साजरा
गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी होणार मदत
सुरेन्द्र इखारे वणी : – शहरात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण उपक्रमात अग्रणी असलेले स्माईल फाऊंडेशनचा 3 रा वर्धापन दिवस बुक बँकचे शुभारंभ व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. बुक सुरु करण्यासाठी वणीतील प्रसिद्ध उद्योजक किरण दीकुंडवार व डॉ. प्रणाली सचिन दुमोरे यांनी बँकेला मोफत पुस्तके उपलब्ध करुन दिली.
शहरातील अनेक विद्यार्थी नीट, जेईई, यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षाची तयारी करीत आहे. मात्र अनेक गरजू व गरीब विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महागडी पुस्तके विकत घेणे परवडत नाही . स्माईल फाऊंडेशनने सुरु केलेल्या बुक बँक या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत होईल. स्माईल फाउंडेशन बुक बँकेत उपलब्ध असलेली पुस्तके गरजू विद्यार्थी मोफत वाचायला किंवा वापरण्याकरिता घेऊन जाऊ शकतात.
यावेळी नुकतेच सैन्य प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले सैनिक महेश घोगरे व बॉर्डर सिक्योरिटी फोर्स येथे कार्यरत मोहसीन खान, एस.पी.एम शाळेचे मुख्याधापक प्रमोद क्षीरसागर, उपमुख्याधापक तामगाडगे व शिक्षक वृंद यांच्या हस्ते एस.पी.एम शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. सैन्य प्रशिक्षण उत्तमरित्या पूर्ण करुन आलेले सैनिक महेश घोगरे यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला. बुक बँक उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी स्माईल फाऊंडेशनचे पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, अनिकेत वासरिकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, कुणाल आत्राम, निकेश खाड़े, प्रसाद पिपराडे, गौरव कोरडे, तुषार वैद्य, सचिन भोयर, सचिन काळे, मयूर भरटकर, भूषण पारवे इत्यादींनी परिश्रम घेतले. आपणाकडे असलेली कोणत्याही वर्गाची जुनी/नवीन शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षेची पुस्तके व इतर पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य स्माईल बुक बँकेत दान द्यावी. जेणेकरुन कुठलाही गरजू विद्यार्थी पुस्तकाच्या अभावी स्पर्धा परीक्षतेतून वंचित राहू नये. आपल्या एका मदतीमुळे परिस्थिती अभावी पुस्तके विकत घेऊ न शकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोठी मदत होईल. असे सागर जाधव – संस्थापक अध्यक्ष (स्माईल फाऊंडेशन)यांनी सांगितले.