चंद्रयान 3 मोहिमेचे साक्षीदार बनले कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी रुंद
अशोक लोणगाडगे मारेगाव :- भारत जागतिक महासत्ता बनण्याकडे मार्गक्रमण करीत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे भारताची चंद्रयान 3 ही यशस्वी झालेली मोहीम होय. सलग ४२ दिवस ही मोहीम सुरू होती. ही मोहीम 14 जुलै 2023 ला सुरू झाली व 23 ऑगस्ट 2023 ला ही पूर्णपणे यशस्वी ठरली. 3, 84,000 किलोमीटर चा यशस्वी प्रवास करून चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणे अवघडच नाही तर अशक्य असल्याचे जगामध्ये बोलल्या जात होते परंतु भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले चंद्रयान 3 यशस्वीरित्या उतरवले व हा जगाचा गैरसमज दूर केला. असा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरविण्याचा कारनामा करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे. ही चंद्रयान मोहीम आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनुभवावी यासाठी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात यावे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश घरडे सरांनी मानस व्यक्त केला होता त्यानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.