कायर येथील विशेष ग्रामसभेत लडाख येथे कार्यरत जवान भास्कर ठाकरे यांचा सत्कार
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील कायर येथील समाज मंदिरामध्ये कायर ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या सभेत कायर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडजापुर येथील लडाख येथे कार्यरत असलेला जवान भास्कर ठाकरे यांचा सरपंच नागेश धनकासार यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या विशेष ग्रामसभेला कायर येथील कार्यरत विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबधीत विषयासंदर्भात व योजने बाबत सविस्तर माहिती ग्रामसभेला दिली. यावेळी ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच नागेश धनकसार हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य तथा विभागातील अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ग्राम पंचायत कायरचे ग्रामसेवक उमेश वानखडे यांनी ग्रामसभेची रूपरेषा व गावातील कामकाजाची माहिती ग्रामसभेतील ग्रामवासीयाना दिली यावेळी कृषी सहायक चतुर यांनी कृषी विभागाशी संबधीत विविध योजनांची माहिती दिली तसेच ग्रामसभेत शिक्षण विभागातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कवडू जीवने याना शैक्षणिक माहिती विचारताना वर्ग 8 ह्या नियमबाह्य वर्गाची माहिती विचारण्यात आली असता त्यांनी वर्ग 8 ला मान्यता असून अधिक माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला विचारावी असे सांगण्यात आले . तसेच विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापिका रेखा मडावी व सहायक शिक्षक रविकांत गोंडलावर यांनी जिल्हा परिषदेच्या वर्ग 8 च्या नियमबाह्य वर्ग संबधीत कागदपत्रे ग्रामसेवक व सरपंच याना दाखविण्यात आली.यावेळी सभेचे सरतेशेवटी ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच नागेश धनकसार यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना आणून संपूर्ण गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा मानस आहे त्यासाठी वरिष्ठांच्या संपर्कात राहून गावाच्या विकासासाठी निधी कसा आणता येईल असा प्रयत्न करू असे ग्रामवासीयांना आश्वाशीत केले. ग्रामसभेचे आभार ग्रामसेवक उमेश वानखडे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामवासी , ग्रंपंचायत सदस्य ,कर्मचारी उपस्थित होते. ग्रामसभेच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कायरच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.