ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर राज्यसरकारला ओबीसी जनगणना समितीकडून इशारा…….
सुरेन्द्र इखारे वणी:- दि.4 सप्टेंबर 2023 ला राज्यभरात ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वस्तीगृहे सुरू करणे, स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना राबविणे आणि परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या 75 करणे, हे विद्यार्थ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. ह्या तिन्ही योजना येत्या 11 सप्टेंबर पर्यंत सुरू न झाल्यास 12 सप्टेंबरला भिकारी असलेल्या राज्यसरकारच्या विरोधात राज्यभरात “भीक मांगो आंदोलन” केले जाईल आणि यातून जमा होणार निधी राज्यसरकारच्या वित्त विभागाला मनिऑर्डरद्वारे पाठवल्या जाईल, असा इशारा ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, मारेगाव, झरी कडून मा.उपविभागीय अधिकारी, वणी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, मा. अर्थमंत्री, मा.ईतर मागास बहुजन कल्याण मंत्री, मा.समाजकल्याणमंत्री आणि मा.सचिव, ईतर मागास बहुजन कल्याण विभाग व वित्त विभाग यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.निवेदन देताना प्रदिप बोनगीरवार, पांडुरंगजी पंडिले, नामदेवराव जेनेकर, श्यामराव घुमे, प्रभाकर मोहितकर सर, अशोकराव चौधरी, दादाराव राऊत, प्रमोद इंगोले, भैय्याजी पिंपळकर, गजेंद्र भोयर, सुरेश राजूरकर, निलिमा काळे, नारायण मांडवकर, विलास शेरकी, नितीन वैद्य, राजू पिंपळकर, नितीन मोवाडे, अजय भिवरकर, नितीन धाबेकर, प्रविण देवगडे, उमेश खापणे, देवराव देऊळकर, विनोद राऊत, गजानन चंदावार आणि मोहन हरडे हे ओबीसी जनगणना समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.