वणीत बंजारा समाज बांधवांच्यावतीने तिज तोडणीचा कार्यक्रम उत्साहात
सुरेन्द्र इखारे वणी :- वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधवांच्या वतीने आज दिनांक 07/09/2023 रोज गुरुवार ला *तिज तोडणीचा* कार्यक्रम *श्री. जगन्नाथ महाराज सेवाश्रम, वणी* येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री रामकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा बंजारा समाज बांधवांच्या तांड्याचे नायक श्री. जयंतराव चौहान यांच्या शुभ हस्ते श्री कृष्णाच्या मूर्ती चे पूजन व भोग विधी करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून महिला मंडळींनी तिज पूजन केले. त्यानंतर तिज तोडणी करून बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वणी शहराच्या मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. यावेळी बंजारा समाजाच्या महिला भगिनींनीनी वणीच्या निर्गुडा नदीच्या पत्रामध्ये तिज विसर्जन केले.त्यानंतर संपूर्ण समाज बांधवांनी सामूहिक भोजन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.