25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने भरणे कायम बंद करा

सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने भरणे कायम बंद करा .*

*संभाजी ब्रिगेडने दिले तहसीलदार निखिल धुळधळ याना निवेदन.*

अपेक्षित निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सुरेन्द्र इखारे वणी:-महाराष्ट्रात तरूण बेरोजगार मुलामुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना व सरकारी कार्यालयामध्ये अनेक विभागात अनेक पदे रिक्त असतांना सरकारी पदभरती न करता कंत्राटी पद्धतीने सरकारी कर्मचारी नियुक्त करणे हे धोकादायक आणि असंवैधानिक आहे. कंत्राटी भरतीमुळे सरकारी कामकाजातील गोपनीयता आणि सुरेक्षेला धोका निर्माण होवू शकतो . पदभरतीचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या ह्या आमदार,खासदार राजकीय उच्चपदस्त आणि नौकरशाहीतील संबंधित लोकांच्या असण्याची पुर्ण शक्यता आहे.यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि गुणवत्तेला डावलले जाऊ आहे. यामुळे देशाच्या प्रगतीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमदार, खासदार, मंत्री ही पदे भरण्याकरिता सुद्धा ही पद्धत का नाही? तसेच कंत्राटी पद्धतीची सुरूवात प्रथम ही पदे भरण्यापासून करावी.आणि आपणास आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्यास संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी ही पदे स्विकारायला तयार आहे. सर्व कारणांचा विचार करता कत्रांती नोकरभरती ही शासनाचा पैसे वाचविण्याच्या नववार काही उच्चपदस्थ राजकारणी आणि कार्पोरेटला फायदा करण्याचे हेतूने घेण्यात आली आहे तसेच हा निर्णय म्हणजे गरीब बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांच्या भविष्याची थट्टा करणारा आहे या सर्व गोष्टीची दखल घेऊन हा निर्णय त्वरित रद्द करावा  अशी मागणी करण्यात आली आहे   अलिकडे पार पडलेल्या तलाठी भरतीमधील गोंधळा करिता जबाबदार लोकांची निष्पक्ष चौकशी करून कठोर कार्यवाही करावी.
या संदर्भात अपेक्षित निर्णय न झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्य स्तरावर मोठे आंदोलन करेल.असा निर्वाणीचा इशारा आणि मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांचे नेतृत्वात पाठविण्यात आलेल्या निवेदना वेळी रूपेश ठाकरे, शंकर पुनवटकर,सुरेन्द्र घागे,दत्ता डोहे आणि संजय गोडे यांची उपस्थिती होती.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News