23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वणी शहरात “ऑनलाइन तान्हा पोळा” साजरा

वणी शहरात “ऑनलाइन तान्हा पोळा” साजरा

स्पर्धेत मोठ्या प्रमाणात चिमुकल्यांचा सहभाग 

विविध वेशभूषेतील चिमुकल्यानी संस्कृतीचे दर्शन घडविले 

सुरेंद्र इखारे वणी :-   वणी शहरातील  सार्वजनिक महिला समाजाचे वतीने यंदा ऑनलाइन “तान्हा पोळा”आयोजित  करण्यात आला.

वणी शहरातील चिमुकल्या बालकांना कृषी संस्कृतीची ओळख व्हावी व त्यांना पोळ्याचे महत्व कळावे तसेच भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यातही महाराष्ट्रातल्या सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचं आराध्य दैवत बैल व पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा करण्याचा दिवस हा दिवस मोठ्या उत्साहात विदर्भात धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो या दिवसाचे औचित्य साधून  “ऑनलाइन तान्ह्या पोळा” या तान्ह्या पोळ्यात चिमुकल्या बालगोपालानी मोठ्या उत्साहात विविध वेशभूषा परिधान करून नंदीबैलाची सजावट करून उत्तम अश्या बॅगराऊंड ,स्लोगण व सामाजिक राजकीय  झडत्या सहित 30 सेकंदाचा व्हिडीओ व शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता या विषयावर 10 ओळींचा निबंध सुंदर अश्या शब्दांमध्ये पाठविला आहे. या स्पर्धेत  सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी 16 सप्टेंबर 2023 रात्री 12 वाजेपर्यंत व्हिडीओ व फोटो पाठविले या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे स्पर्धक कु आयरा गोरंटीवार वय दोन वर्षे, आर्यन काळे वय 7 वर्ष,अथांग कोंडावार वय दोन वर्षे, सानवी रेगुंडवार, तन्मय दोंतुलवार , साव्या उत्तरवार, अवनिश गोरंटीवार, अनशिका कोडगिरवार, या चिमुकल्यानी  स्पर्धेत भाग घेतला.  या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक महिला समाजाने पुढाकार घेतला. व चिमुकल्यांचे कौतुक केले. 

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News