25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

आदिवासी कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या जाचक अटी रद्द करा

आदिवासी कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या जाचक अटी रद्द करा
विभागीय अनुसूचित आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी संस्कृती संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन
नागपूर जयंत साठे : समायोजित कर्मचाऱ्यांचे सेवाखंड कालावधी क्षमापित करून सदर कालावधीचे वेतन इतर कार्यालयाप्रमाणे अदा करण्यात यावे, वेतन देयकावर संस्थाचालकांची स्वाक्षरी अनिवार्य करण्याची अट तात्काळ रद्द करावे, शासकीय अनुदानित शाळेमधील कार्यरत शिक्षकांची क्षमता परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी विभागीय अनुसूचित आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी सांस्कृती संघटनेच्या वतीने संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात विभागीय अध्यक्ष भोजराज फुंडे, विभागीय उपाध्यक्ष यादव धानोरकर, विभागीय सचिव प्रकाश उघाडे, विभागीय सहसचिव विकास जनबंधू यांचे सह कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाच्या वतीने आदिवासी शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत असल्याची त्यांची भावना बळावली असून सार्वजनिक हिंदू व इतर सणाच्या दिवशी तपासणी पथके रद्द करून सामाजिक व धार्मिक सण साजरा करण्याचा अधिकार कायम ठेवण्यात यावा, अल्पसंख्यांक संस्थेमध्ये समायोजनाने कर्मचाऱ्यांना समायोजित करून घेण्यात यावे, सहविचार सभेतील सर्व प्रश्न निकाली काढण्यात यावे, शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करण्यात यावा, इयत्ता दहावी ते बारावीचे निकाल 80 टक्के व 50 टक्के पेक्षा कमी लागल्यास होणारी वेतन वाढ रोखण्याची कार्यवाही तात्काळ रद्द करून विद्यार्थी गुणवत्तेसाठी नियोजन करावे, कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखा असणाऱ्या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर यांना पदोन्नती देण्यात यावी, समायोजनामध्ये आरक्षणाची अट रद्द करण्यात यावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रजा देण्यात याव्या, शासकीय आश्रम शाळेत प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात कोणत्या शासन निर्णयानुसार भरती करण्यात आले याची संघटनेला माहिती देण्यात यावी, अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचारी अतिरिक्त असताना त्यांचे समायोजन शासकीय आश्रम शाळेमध्ये न केल्यामुळे एकीकडे आमच्या कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे व दुसरीकडे शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहे, असे संघटनेचे ठाम मत आहे. यासह विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदनाच्या प्रतिलिपी विधान परिषद सदस्य तथाशिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना देण्यात आले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News