25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करू

प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करू
मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांचे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाला आश्वासन

नागपूर ( जयंत साठे ): खोटी आश्वासन देऊन खोटी कागदपत्रे सादर करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करू असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या शिष्टमंडळासोबत बोलताना दिले. कास्ट्राईब संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळांनी भेट दिली असता त्या बोलत होत्या. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असिम इनामदार तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले, त्यात पदोन्नतीत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणे बाबत विचारणा केली असता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गोलमाल उत्तर दिले. तसेच आरोग्य सहाय्यक देवेंद्र सावदे यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारबोर्ड तालुका रामटेक येथे विशेष बदली नियमबाह्य असल्याने तात्काळ रद्द करावी, सरळ सेवा भरती अंतर्गत एकूण मंजूर पदे भरलेली पदे व रिक्त पदाचे संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय माहिती देऊन रिक्त पदे भरावी, पदोन्नती अंतर्गत एकूण मंजूर पदे भरलेली पदे व रिक्त पदांचे संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय माहिती देऊन रिक्त पदे भरावी, भविष्य निर्वाह निधी तात्काळ कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावे, जिल्हा परिषद मधील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना दहा-वीस व तीस वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती द्यावी, आरोग्य सेवक या संवर्गाची मागासवर्गीय प्रवर्गातील पदोन्नती मधील त्रुटी दूर करावी, कर्मचारी संवर्गाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, जिल्हा परिषद नागपूर परिसरात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघास मंजूर केलेल्या कार्यालयाचा ताबा देण्यात यावा, जिल्हा परिषद मध्ये मागासवर्गीय कक्ष स्थापन करून महासंघाच्या पदाधिकाऱ्यास सदस्य म्हणून नियुक्ती द्यावी, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा विनाविलंब वेळेवर करावे ,दरवर्षी सेवा पुस्तक अधिकारी व कर्मचारी यांना अवलोकनार्थ देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी, जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक वैद्यकीय प्रतिपुर्ती बिले तसेच ट्रान्सफर बिले एक महिन्यात मंजूर करावे व थकीत बिले तात्काळ मंजूर करावी, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करून त्यांना दोन अतिरिक्त वेतन वाढ देण्यात यावे, शासन नियमाप्रमाणे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वार्षिक सात ते दहा दिवस विशेष रजा मंजूर करावी, यासह विविध मागण्यांसाठी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सिताराम राठोड, विभागीय अध्यक्ष कृष्णा मसराम, जिल्हा सचिव राजेंद्र काळे, जिल्हा अध्यक्ष भास्कर बांबोडे, अशोक पाटील, सिद्धार्थ उके, स्नेहल मेंढे, मनीषा वाघे, डॉ राजेश पवार, यशवंत माटे, भीमप्रकाश हर्ले , कुंदाताई बंडराखे, अरविंद पाटील व साधना हिंगे उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News