रासेयो च्या वतीने मेरी माटी, मेरा देश हा उपक्रम उत्साहात साजरा
अशोक लोणगाडगे मारेगाव :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मेरी माटी, मेरा देश या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अमृत कलशामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणलेली शेतातील माती कलशा मध्ये टाकून सदर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. श्रीराम खाडे, डॉ. दिनेश गुंडावार, डॉ. गजानन सोडणर, डॉ. राजेश चवरे, डॉ. विनोद चव्हाण, प्रा. प्रदीप माकडे, डॉ. विभा घोडखांदे डॉ. मीनाक्षी कांबळे व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी आदींनी अमृत कलशा मध्ये आणलेली माती टाकून अमृत कलशाचे संकलन करण्यात आले …
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्यात आली.