25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण व सरकरी शाळांचे व्यापारीकरण करण्याच्या विरोधात धरणे आंदोलन    

शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण व सरकरी शाळांचे व्यापारीकरण करण्याच्या विरोधात धरणे आंदोलन    

सर्व कर्मचारी संघटना व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 

सुरेंद्र इखारे वणी :-  शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करणे आणि सरकारी शाळांचे व्यापारीकरण करणे  या निर्णयाविरोधात सर्व कर्मचारी संघटना आणि सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोज शनिवारला दुपारी 12:30 वाजता वणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर “एक दिवसीय धरणे आंदोलन” आयोजित केले आहे.  

            महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करणे ,सरकारी शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देऊन त्यांचे कंपनीकरण करणे या दोन्ही अन्यायकारक निर्णयांचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व कर्मचारी संघटना व सामाजिक संघटनाच्या वतीने एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. तरी, “हा माझा लढा आहे”, हे समजून घेऊन या धरणे आंदोलनात मित्रपरिवारासह सहभागी व्हावे  निष्ठुर शासनाच्या आत्मघाती निर्णयाविरुद्ध निषेधाचा आवाज बुलंद करण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर व कर्मचारी संघटना तसेच, सामाजिक संघटनानी स्वेच्छेने सहभागी व्हा. नोकऱ्या वाचवा, शाळा वाचवा, आपले भविष्य वाचविण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान वणी तालुका  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News