लोकमान्य टिळक महाविद्यालयात केमिकल सोसायटीचे उद्घाटन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केमिकल सोसायटीची स्थापना
मोठ्या संख्येने मुलींचा सहभाग
सुरेंद्र इखारे वणी –
वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागा तर्फे विद्यार्थ्यांसाठी केमिकल सोसायटी २०२३-२४ चे उद्घाटन करण्यात आले. रसायनशास्त्र विभागातर्फे दरवर्षी रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, मंच धारिष्ट्य विकसित करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याकरीता केमिकल सोसायटीची स्थापना केली जाते. यावर्षीच्या केमिकल सोसायटीची स्थापना करून त्याचे औपचारिक उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.प्रसाद खानझोडे, विभाग प्रमुख डॉ. सुनंदा अस्वले, सोसायटीचे समन्वयक डॉ. प्रशांत लिहितकर तथा शिवरामजी मोघे महाविद्यालय,पांढरकवडा येथील निमंत्रित पाहुणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रविण गांजरे यांच्या उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडले.
यात एम एस सी फायनल ची विद्यार्थिनी हिना सिद्दिकी हिची अध्यक्षपदी बीएससी फायनल मधून उपाध्यक्षपदी मीनाक्षी भगत हिची तसेच सचिवपदी एम.एस सी फर्स्ट इयर ची विद्यार्थिनी जयश्री बोढे व बीएससी सेकंड ईयर चे चंद्रकांत रासेकर यांची निवड झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता राऊत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या केमिकल सोसायटीचे उद्दिष्ट्ये व निवड प्रक्रिये बद्दल डॉ. प्रशांत लिहितकर यांनी माहिती दिली. रसायनशास्त्र विभागांमधील बीएससी व एम.एस्सी च्या सर्व विद्यार्थ्यांमधील ९ विद्यार्थ्यांची केमिकल सोसायटीच्या कार्यकारी टीम मध्ये निवड केल्या गेली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रविण गांजरे यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख डॉ. सुनंदा अस्वले मॅडम व प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी सुध्दा याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये १०० मुलांनी सहभाग घेतला. प्रा.मोनाली कडासने यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाकरीता प्रा.राहुल ठेंगणे, प्रा.अश्विनी धुळे, प्रा. हर्षदा तांबेकर, प्रा. रुपाली राजुरकर, राजु आगलावे, कुशल झाडे, संजय बिलोरीया यांनी विशेष सहकार्य केले.