25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पुढाकारानेच यवतमाळ जिल्ह्याचे प्रादेशिक  कार्यालय चंद्रपूर

महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पुढाकारानेच यवतमाळ जिल्ह्याचे प्रादेशिक  कार्यालय चंद्रपूर

    माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या प्रयत्नाला यश 

सुरेन्द्र इखारे वणी :-          यवतमाळ जिल्हा अंशतः बदल करून प्रादेशिक कार्यालय अमरावती आदेश रद्द करून यवतमाळ जिल्हा पूर्वरत प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर येथे कायम ठेवण्याबाबतचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी मा सुधीरभाऊ मुनगंटीवार वने व सांस्कृतिक मंत्री याना देण्यात आले.              महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यलय चंद्रपूर विभाग अंतर्गत उपप्रादेशिक कार्यलय चंद्रपूर या कार्यालयाचे कार्यक्षेत्र चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ असे निश्चित करण्यात आले होते. सदस्य सचिव यांच्या आदेश क्र ई 84/23 नुसार पूर्वीच्या कार्यक्षेत्रात अंशतः बदल करून त्यातून यवतमाळ जिल्हा वगळून यवतमाळ जिल्ह्याचे कार्यक्षेत्र प्रादेशिक कार्यालय अमरावती विभागाअंतर्गत उपप्रादेशिक कार्यलय अमरावती -2 येथे वर्ग करण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रमुख उद्योग कोळसा, सिमेंट,कोल वॉशरी,  गिट्टी क्रेशर ,डोलमाईत, लैमस्टोन खान चुनभट्टी  जिनिंग प्रेसिंग यासारखी प्रदूषणयुक्त उद्योगधंदे असल्याने चंद्रपूर येथे प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे यामध्ये जल, वायू यांचे नमुने अत्याधुनिक पध्दतीने परिक्षण केले जाते त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर प्रादेशिक कार्यालय सुलभ व सोयीचे आहे . हे सर्व उद्योगधंदे  मोठ्या प्रमाणात वणी झरी व मारेगाव येथे आहे. तसेच वणीसाठी  चंद्रपूर कार्यलय अंतर केवळ 40-50 किलोमीटर आहे त्यामुळे  प्रदूषण संबंधातील सर्व समस्यांकरिता चंद्रपूर कार्यल्यात जाणे सुलभ व सोयीचे आहे. परंतु मा अविनाश ढाकणे सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 31 जुलै 2023 च्या कार्यलयीन आदेश क्रमांक इ 84/ 2023 नुसार अमरावती येथे उपप्रदेशिक कार्यालयांतर्गत यवतमाळ जिल्हा वर्ग करण्यात आल्यामुळे वणी झरी व मारेगाव तालुक्याकरिता अमरावती हे अंतर 200-250की मी इतक आहे त्यामुळे नागरिकांना प्रदूषणाच्या समस्या संदर्भात व उद्योजकांना परवाना कामाकरिता अमरावती येथे 200-250 की मी जाणे गैरसोयीचे आहे.तेव्हा यवतमाळ जिल्हा पूर्वरत प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर येथे जोडून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु या मागणीच्या निवेदनाची दखल घेऊन  नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य मत्सेव्यवसाय यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हा प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्याकडे पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आले आहे तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सुद्धा पत्रव्यवहार करून न्याय मिळवून दिला . त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे  आभार मानले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News