25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

जैन-ले-आऊट येथील सुखकर्ता शिव गणेश मंडळाने श्रद्धांजलीच्या निमित्ताने घेतले रक्तदान शिबिर

जैन-ले-आऊट येथील सुखकर्ता शिव गणेश मंडळाने श्रद्धांजलीच्या निमित्ताने घेतले रक्तदान शिबिर

 सुरेन्द्र इखारे वणी :-    दानातदान सर्वातश्रेष्ठ   दान रक्तदान असे म्हटले जाते तेव्हा जैन -ले आऊट येथील सुखकर्ता शिव गणेश उत्सव मंडळाने स्व अजय विधाते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

          या रक्तदान शिबिराचे अध्यक्षस्थानी कळमना येथील शिक्षक दत्ता महाकुलकार हे होते. प्रमुख उपस्थिती मारोती मालेकार, लटारी विधाते तसेच लाईफलाईन ब्लड बँकेचे सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते.    

        स्व अजय विधाते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये जैन ले आऊट येथील सुखकर्ता शिव गणेश उत्सव मंडळातील सदस्य व परिसरातील 83 नागरिकांनी उत्स्फूर्त पणे रक्तदान करून मंडळाला सहकार्य केले. यावेळी मंडळांने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून स्व अजय विधाते याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले तर मंडळाच्या सदस्यांनी आभार मानले . कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी वैभव गायकवाड, सूरज रिंगोले, नितीन गोहोकार, क्षितिज भोयर, प्रज्वल नागतुरे, रुपेश चांदे, धीरज ढाले, पवन बरडे, वैभव करडभुजे, सुमित राजूरकर व सर्व मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News