मेरी माटी- मेरा देश अंतर्गत शाळा क्र. 7 तर्फे माती गोळा
विठ्ठलवाडी वॉर्डातून अमृत कल
सुरेन्द्र इखारे वणी:-
मेरी माटी- मेरा देश या उपक्रमाअंतर्गत दि. 26 सप्टेंबरला प्रभात फेरी काढून दिल्लीला पाठविण्यासाठी मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी वार्डात फिरून कलशामध्ये माती गोळा केली.
सर्वप्रथम या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर या उपक्रमाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर घोष पथक व राष्ट्र ध्वजासह विठ्ठलवाडी परिसरात घरोघरी जाऊन विद्यार्थी व शिक्षकांनी माती गोळा केली आहे. या उपक्रमाला पालकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना मुंजेकर, चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे यांनी परिश्रम घेतले.