25.5 C
New York
Saturday, July 13, 2024

*दातृत्व व मातृत्वाचा प्रांजळ झरा म्हणजे – सौ सीमाताई चोरडिया*

*दातृत्व व मातृत्वाचा प्रांजळ झरा म्हणजे – सौ सीमाताई चोरडिया*

 सुरेंद्र इखारे वणी :-  येथील दानशूर व्यक्तिमत्त्व व समाजकार्यात ओढून घेणारे समाजसेवक  विजयभाऊ चोरडिया यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या  निमित्ताने श्री विनायक मंगल कार्यालयात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

 यानिमित्ताने आदरणीय दातृत्वाची संवेदना असणारा दाता सौ. सिमाताई चोरडिया यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्नेहभोजनाकरिता  वणी येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र ९च्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले. व त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ऑटोची  व्यवस्था केली.व त्यांना बोलावून घेतलं.  आईच्या मायेने सर्व स्वतः च्या हाताने खाऊ घातले. प्रेमाने त्यांची विचारपूस केली. अतिशय प्रेमळ, दातृत्वाने केलेल्या आदरातिथ्याने मुले भारावून गेली. हा जो प्रेमाचा व आपुलकीचा भाव  भक्तीभावाशी जोडणारा दिसून आला .आपण जे  दान करतो ते दान भक्तीयुक्त भावनेने व अतिशय समर्पित वृत्तीने दिलेलं दान पूर्णपणे निरपेक्ष असते.कारण  देणारा भक्त आणि ज्याला दान दिले तो भगवंत असतो हे त्या चोरडिया कुटुंबियांच्या दातृत्व व मातृत्व भावनेतून दिसून आलं. म्हणूच कोण्या कवीने म्हटले आहे. ” रंग रूप वा असो गंधही ” यातील माझे काहीच नाही . या भावनेने दान करण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा चोरडिया कुटूंबियांनी जोपासली आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप कोरपेनवार, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ वेणुताई कोटरंगे व नगर परिषद शाळा क्रमांक 9 ची चिमुकली विद्यार्थी उपस्थित होते यानिमित्ताने  शाळेच्या वतीने चोरडिया कुटूंबियांचे आभार मानले

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News