23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथरडकर यांचे कडून नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठीच्या मुलींना “टी शर्ट ” ची भेट

लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथरडकर यांचे कडून नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठीच्या मुलींना “टी शर्ट ” ची भेट

     सुरेंद्र इखारे वणी:- येथील फार जुनी असलेल्या नृसिंह व्यायाम शाळेतील लाठीकाठीच्या मुलींना दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोज गुरुवारला सायंकाळी 6.30 वाजताचे दरम्यान लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथरडकर यांनी ” टी शर्ट”ची भेट देऊ केले आहे. 

        वणी शहरातील नृसिंह व्यायाम शाळेच्या प्रांगणामध्ये मुलींचा लाठीकाठीचा खेळ सुरू होता यामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे प्रशिक्षणाचे माध्यमातून दिले जात होते .याप्रसंगी राजाभाऊ पाथरडकर व ए पीआय माधव शिंदे ,दीनानाथ आत्राम गुरुजी, मंगला झिलपे ,नीलिमा काळे, शाहीदभाई शेख, माजी पोलीस पाटील नितीन शिरभाते, विनोद ढूमने, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ इंगोले यांनी मुलींच्या शौर्याचे कौतुक करून उपस्थित मान्यवरांचे   हस्ते नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठीच्या मुलींना “टी शर्ट ”  भेट दिले.  यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे संचालक पांडुरंगजी ताटेवार, दादाराव राऊत, सूर्यकांत मोरे, दत्ता मुजगेवार, बाबाराव उगले, नागो नलभीमवार, दिलीप येमुलवार, रमेश शर्मा,कार्तिक पटेल, पांडुरंग पारावार, कुणाल बुरेवार, गोविंदा मुजगेवार,कुणाल ठोंबरे, कु अंजली उगले व मुलींची लाठीकाठी चमू उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News