23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात राज्यस्तरीय आंदोलन

कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात राज्यस्तरीय आंदोलन
नागपूर : जयंत साठे – कामगार -कर्मचारी-कंत्राटी- शिक्षकआणि सामाजिक संगठनाची खाजगीकरण -कंत्राटीकरण धोरण विरोधी राज्य स्तरीय आंदोलन कृती समिती च्या वतिने सरकारी नोकरीचे खाजगीकरण , सरकारी शाळा बंद करणे व आरक्षण बंद करणारे धोरण , व शिक्षित तरुणाचा रोजगार नाकारणाऱ्या धोरणविरोधात सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन
सोमवार,दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी संविधान चौक, नागपूर दुपारी 11.30ते 2.00वाजेपर्यंत आयोजित केले आहे. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
सरकारी नोकरीचे खाजगीकरण करणारा दि 6सप्टेंबर 2023चा बेकायदेशीर व असंविधानिक शासन निर्णय तात्काळ रद्द करणे ,सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे ,सरकारी शाळा बंद करणारे धोरण बंद करा व शाळां कार्पोरेट घराण्याच्या हवाली करणारा दि 18सप्टेंबर 2023चा शासन निर्णय रद्द करून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भर्ती बंद करावी,सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा व सरळ सेवा भरतीचे 4.80लाख पदे तात्काळ भरण्यात यावी या आहेत.
मागण्या मान्य होई पर्यंत आंदोलन संपूर्ण महाराष्टात सुरु राहील.सरकारी दडपशाहीच्या व मागासवर्गीय धोरण विरोधात सर्व ओबीसी- एस सी -एस टी बांधवानी एकजुटीने बहुजन हिताच्या या लढयात सामील व्हावे. असे आवाहन कास्ट्राईब महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांनी केले आहे.असे खाजगीकरण -कंत्राटीकरण धोरण विरोधी राज्य स्तरीय आंदोलन कृती समिती व कास्ट्राईब महासंघाचे सिताराम राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News