23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

कंत्राटीकरणामुळे आदिवासी समाज उघड्यावर

कंत्राटीकरणामुळे आदिवासी समाज उघड्यावर
नागपूर, जयंत साठे : कंत्राटीकरणामुळे आदिवासी, अनुसूचित जाती, वंचित व बहुजन समाजातील युवकांचा रोजगार हिरावून घेतल्या जात आहे. आरक्षणाची लढाई सुरू असताना थेट आरक्षणालाच कात्री लावण्यासाठी सरकारी भरतीला पर्याय म्हणून कंत्राटीकरण करण्याचे शासनाने ठरविले आहे. तद्वतच महाराष्ट्रातील मूळ आदिवासींमध्ये परप्रांतीय व धर्मांतरण केलेल्या जमातींनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे ती थांबवावी. अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ह्यूमन या संघटनेने केली आहे.
महाराष्ट्रातील मुळ आदिवासींमध्ये परप्रांतीय व धर्मांतरण केलेल्या जातीची घुसखोरी थांबवा, राज्यातील 45 पैकी दहा ते बारा जमातींना आरक्षणाचे घुसखोरी करून फायदे घेतले आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी करा, वर्षानुवर्षे अनुसूचित जमातीचे राखीव मतदारसंघ तेच ते असल्याने विस्तारित क्षेत्रातील ज्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोटेशन पद्धतीने आरक्षण ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने जगदीश बहिराविरुद्ध एफसीआय आदेश 2017 पूर्वी विविध शासन आदेशांमुळे सेवा संरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुसूचित जमातीची पदे रिक्त केल्यामुळे त्यांना अधिसंख्या पदावरून वगळून नियमित पदावर ठेवा, सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना भरावी लागणारी फी कमी करा, आदिवासी जमातींना जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या 14 बोगस आदिवासी आमदार व दोन बोगस आदिवासी खासदार यांना हटवावे, आदिवासी विकास विभागात सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका, आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष सुरेश धस यांचा आदिवासी विकास विभागात दाबून ठेवलेला अहवाल तात्काळ उघड करा, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीने प्रधान यांना परधान जमातीचे, आंध यांना अंध जमातीचे, बुरुड यांना गोंड जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा व या तपासणी समितीची व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा. यासह विविध मागण्या करण्यात आल्यात. यावेळी दामोदर खडगी, आशा वाघ, मधु पराड, नरेंद्र निमजे, प्रवीण मदनकर, दिलीप भानुसे हे उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News