दीक्षाभूमीवर 22 ऑक्टोबर ला महिला परिषद
नागपूर जयंत साठे: 68 व्या धम्मचक्कपवत्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दिवसभराचा कार्यक्रम दीक्षाभूमी महिला धम्म समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे.
दीक्षाभूमी महिला धम्म समितीच्या आद. कमलताई गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे एक दिवसीय सकाळी 9 ते रात्री पर्यंत महिलांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बौद्धिक, धार्मिक, सामाजिक, परिषद व चर्चा सत्र तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
दीक्षाभूमी महिला समितीच्या वतीने जास्तीतजास्त प्रबुद्ध आंबेडकरी जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन समिती तर्फे करण्यात आले. बैठकीचे संचालन दीक्षाभूमी महिला समितीच्या सचिव तक्षशीला वाघधरे, विशेष उपस्थिती प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहेरे, डॉ प्रज्ञा बागडे यांची होती. वंदना जीवने, डॉ सरोज डांगे, रंजना वासे, उज्वला गणवीर, ज्योती आवळे, डॉ वीणा राऊत, शार्दूला महाजन, प्रा. पुष्पा घोडके, ऍड स्मिता कांबळे, उज्वला मेश्राम, कल्पना मेश्राम, माया थोरात, कल्पना मुन, डॉ माधुरी पाटील, सविता सिरसाट, शिला इंगळे, वनिता कडबे, परिता झोडापे, वंदना आटे, माया पाटील, शालिनी मनोहर, अन्नपूर्णा खांडेकर, विशाखा नकाशे, वनिता कडबे, गंगा खांडेकर, आम्रपाली मेश्राम, लता महेशकर, महानंदा राऊत. इत्यादी महिला व महिला संघटनेच्या पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.