25 C
New York
Saturday, July 13, 2024

*बालविवाह मुक्त भारत अभियान जनजागृती रँली संपन्न*

*बालविवाह मुक्त भारत अभियान जनजागृती रँली संपन्न*
*ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्ट व समाजशास्त्र विभाग तथा रा.से.यो.लोकमान्य टिळक महा.वणीचा संयुक्त उपक्रम*

सुरेंद्र इखारे वणी :-  दि.१६/१०/२३ सकाळी ९.०० वाजता ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे बालविवाह मुक्त भारत अभियान या अंतर्गत जनजागृती पर रॅलीचे आयोजन करण्यात आले याचे उद्घाटन मा. आमदार संजीव रेड्डीजी बोधकुरवार यांनी श्री . शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून रॅलीची सुरूवात केली .रॅली ची सुरुवात लोकमान्य टिळक महाविद्यालय पासून शिवाजी महाराज चौक पर्यंत झाली. तिथे मा.आमदार श्री. संजीव रेड्डीजी बोधकुरवार यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भारत आधुनिकतेची उच्चांक सीमा गाठत आहे पण आजही ग्रामीण भागात बालविवाह प्रथा मोठ्या प्रमाणात दिसते. यासाठी जनजागृती करणे गरजेची आहे आणि या जनजागृती मध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे कौतुक केले व शुभेच्छा देऊन रॅली ला हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. रॅली लोकमान्य टिळक महाविद्यालय पासून शिवाजीमहाराज चौक ते महात्मा गांधी चौक, रवींद्रनाथ टागोर चौक करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक करीत परत महाविद्यालयात परत आली. हा सर्व उप्रकम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला याचे नियोजनराष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलिमा दवणे यांचे होते राष्ट्रीय सेवा योजनेचे व समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी या रॅली मध्ये सहभाग नोंदविला.ग्रामीण समस्या मुक्ति ट्रस्टचे ट्रस्टी कुंटलेश्वर तूरविले, आरोग्य समन्वयक गणेश माणूसमारे, आऊटरीच वर्कर मंगेश मुळे, अमोल कुळसंगे, एम अँड ई. नंदनी पानेरी, समुदाय समाज कार्यकर्ता कार्तिक कोकुडे, प्रिया नाकाडे, संकेश नामपेल्लीवार आदि उपस्थित होते.

 

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News