23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

व्यसनाधीन पिढीमुळे आर्थिक व सामाजिक घटकाचे नुकसान : श्री. अमीर देसाई

व्यसनाधीन पिढीमुळे आर्थिक व सामाजिक घटकाचे नुकसान : श्री. अमीर देसाई

सुरेन्द्र इखारे वणी :-  मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यवतमाळ जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात  व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अविनाश घरडे हे होते . प्रमुख मार्गदर्शक  मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे येथील श्री. अमीर देसाई तर प्रमुख अतिथी  मारेगाव पोलीस स्टेशनचे  ठाणेदार  जनार्दन खंडारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी  प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय स्थानावरून  बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे म्हणाले  ‘व्यसन दूर करणे कठीण आहे’, ही पराभूत मानसिकता झुगारून द्या आणि ‘व्यसनाच्या विचारांशी लढून व्यसनरूपी शत्रूला ठार मारायचे आहे’, ही विजिगिषू वृत्ती अंगी बाणवा ! मनाला खंबीर बनवण्यासाठी नियमित ‘प्राणायम व योग ’ करावे असे अवाहन केले. प्रमुख
मार्गदर्शक  अमीर देसाई म्हणाले व्यसनामुळे होणारे वाईट परिणाम व व्यसनातून मुक्त होण्यासाठी चे उपाय विद्यार्थ्यांना तसेच विविध गावातून आलेल्या नागरिकांना सांगितले. तसेच ठाणेदार जनार्दन खंडारे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता सर्वप्रथम आपल्या करिअर कडे लक्ष केंद्रीत केल पाहिजे असे  मत व्यक्त केले. सोबतच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News