23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

डॉ. अभिजित अणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.

डॉ. अभिजित अणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.

सुरेंद्र इखारे वणी   :- लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील इंग्रजी विषयाचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विज्ञान भाषा विभागाचे अभ्यासक्रम मंडळ सदस्य, विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव डॉ अभिजित रमेशराव अणे यांच्या ” द स्प्लिट पर्सनॅलिटी ऑफ गिरीश कर्नाडस् हिरोज ” या पुस्तकाचे काल विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , विलास मानेकर, माधव सरपटवार दिलीप आलोने ,किशोर साठे, गजानन कासावार, राजाभाऊ पाथ्रडकर या मान्यवरांच्या उपस्थितीत ,९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यापूर्वी मी गिरीश कर्नाडांचा नायक बोलतोय ! या पुस्तकानंतर डॉ अभिजित अणे यांचे हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे हे विशेष उल्लेखनीय.
पुस्तकाचे अंतरंग उघडून दाखवताना विदर्भ साहित्य संघाचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य रमेश जलतारे यांनी गिरीश कर्नाड यांच्या योगदानाचे वर्णन करीत सध्याच्या काळात देखील लागू पडणारे राजकारणाचे वर्णन या नाटकांमधून कसे आलेले आहे हे आरंभी स्पष्ट केले.
या नायकांच्या ठिकाणी जशा सकारात्मक गोष्टी आहेत तशीच त्यांच्या ठिकाणी असणारी नकारात्मकता आणि त्यामुळे पुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आलेली दुभंग अवस्था तथा त्यामधील संघर्ष डॉ. अणे यांनी नेमका टिपला असल्याचे अधोरेखित केले.
आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आणि रवींद्र शोभणे यांनी या त्यांच्या पीएचडी चा मराठी अनुवाद जनसामान्यांसाठी लवकरच उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी रवींद्र शोभणे यांच्या हस्ते लेखक डॉ अभिजित अणे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना या प्रकाशाच्या मागे असणाऱ्या स्व. रमेश अणे तथा स्व. नरेंद्र नगरवाला यांच्या प्रेरणेचा उल्लेख करून भविष्यात गिरीश कर्नाड किंवा या साहित्य कृतींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल अशी आशा डॉ .अणे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे लवकरच याचे मराठी भाषांतर करण्याचा आणि या नायकांप्रमाणेच नायिकांचा देखील परिचय घडवणारे ग्रंथ प्रकाशित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्र उत्सवात विदर्भ साहित्य संघाच्या द्वारे आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ वणीचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. या कार्यक्रमास वणीतील अनेक गणमान्य नागरिक विशेषत्वाने उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News