23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

जैताई नवरात्राची भजन सेवेने सांगता.

जैताई नवरात्राची भजन सेवेने सांगता.

सुरेन्द्र इखारे वणी    :- जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्राच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि भरगच्च कार्यक्रम मालिकेची काल अश्विनी शुद्ध नवमीच्या पावन पर्वावर रात्री जैताई भजन मंडळाद्वारे सादर केलेल्या भजन सेवेने सांगता झाली.
परब्रह्म रुपं गणेशं भजेम | या श्लोकाने आरंभ करीत देवगृहीचा भक्त जणांना गौरी नंदन पावला या गीतासह भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज विरचित श्री गणेश पञ्चरत्न स्तोत्रा आणि गणेश वंदना साधली गेली.
यानंतर या हो या हो सकळ जण हो वंदू गुरुराया ! या गीताने गुरुवंदना झाल्यावर, जय अंबे जगदंबे सकलांची माता, हे शिवरमणा जागो मा , निजानंद गे माये फुगडी फू, जय अंबे माता जगदंबे माता, रेणुका मातेच्या नावाची घुमे सदा ललकारी, हसत ये अंबे नाचत ये, अंबे जोगवा जोगवा मागते, उदो उदो अंबे जगदंबेचा उदो अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करण्यात आली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती सरपटवार यांच्या संयोजनात, प्रणिता पुंड यांच्या मार्गदर्शनात , अपर्णा देशपांडे , वीणा देशपांडे, संध्या कोकास, निलिमा जीवने, संध्या अवताडे, लता पांडे, मनीषा ढुमे, दीक्षा काशीकर, लक्ष्मी पाटील, स्नेहलता चुंबळे, अर्चना उपाध्याय, कविता सुरावार, वृषाली देशमुख, स्मिता कावडे, शीला वटे, अलका तराळे, माधवी जोशी यांनी भजन सेवेत सहभाग घेतला.
संवादिनीवर दादाराव नागतुरे तर तबल्यावर नामदेव ससाणे यांनी साथ संगत केली.
जैताई देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांच्यासह देवस्थानचे सदस्य आणि वणीतील अनेक गणमान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या संगीत सेवेचा आस्वाद घेतला.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News