*धर्माधिष्ठीत राष्ट्राची कल्पना अत्यंत गंभीर आणि धोकादायक*
– ज्ञानेश महाराव –
सुरेन्द्र इखारे वणी :- धर्माच्या आधारे निर्माण झालेले पाकीस्तान, बांग्लादेश आणि ईतर देशांची परिस्थिती बघीतली तर धर्माधिष्ठीत राष्ट्राची कल्पना किती अव्यवहार्य,तकलादू आणि फसवी आहे याची कल्पना येते.त्यामुळे हिंदूराष्ट्र -हिंदुराष्ट्र अशी संकल्पना आणि घोषणा करणाऱ्या तथाकथित लोकांच्या बुद्धीची किव करावी,तेवढी कमी आहे.सोबतच अशा कल्पनेतील फोलपणा आणि गांभीर्य लक्षात घ्यावे.धर्म कोणताही असो.धर्माधिष्ठीत राष्ट्र संकल्पना ही अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे,असा ईशारा प्रख्यात पत्रकार,संपादक आणि रंगकर्मी ज्ञानेश महाराव यांनी दिला.
शिव महोत्सव समिती वणी चे वतीने दि.२७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या बळीराजा व्याख्यानमालेत ” फक्त राष्ट्रभक्तांसाठी ” या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणुन संबोधित करत होते.स्मृतीशेष सांबशिव नारायणराव देवडे यांच्या स्मृतीस समर्पित हे व्याख्यान बाजोरिया लॉन,वणी येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी विराजमान होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर,शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोक सोनटक्के,एलआयसी चे अजय गेडाम,निलीमाताई काळे,शिरपुर च्या पोलीस पाटील सुवर्णा बोंडे उपस्थित होत्या.
” फक्त राष्ट्रभक्तांसाठी ” या विषयाची गुंफण करतांना ज्ञानेश महाराव यांनी ईसराईल या देशाचे उदाहरण दिले.राष्ट्र हे फक्त भौगोलीक सिमांनी बनत नाही तर राष्ट्र हे मनांत आणि विचारात असावे लागते.त्यामुळे सद्या देशात जी लोक राष्ट्रभक्तीच्या नांवाने गळे काढत आहे त्यांच्यापासुन सावध राहावे.देशांत,समाजात जे जे अनिष्ट आहे,विकृत आहे त्या विरुद्व आपण व्यक्त झाले पाहीजे.ते ईतरांनाही सांगीतले पाहीजे.तरच आपण काही ऊज्वल भविष्याचे स्वप्न पाहु शकु.पुराणकाळातील कल्पोकल्पित आणि भाकडकथांवर देशाची उभारणी होऊ शकत नाही. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या काळात आरबीआय बँकेची वापरलेली राखीव गंगाजळी,काही उद्योगपतींचे माफ केलेले अब्जोवधींचे कर्ज,अमर्याद झालेल्या जंगलतोडीमुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान यांवर महाराव यांनी मार्मिक भाष्य केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी व्याख्यानमालेचा उद्देश कथन करून व्याख्यानमालेचे हितचिंतक,आश्रयदाते आणि श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
व्याख्यानमालेच्या प्रारंभी बळीराजा च्या प्रतिमेला माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले.जयंत कुचनकार,अमोल बावने,दिगांबर ठाकरे आणि सोनाली थेटे यांच्या सामुहिक जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समितीचे वतीने संजय गोडे यांनी,प्रास्ताविक भुमिका गणेश बुटे यांनी तर आभार अजय धोबे यांनी मानले.मान्यवरांचे स्वागत समितीचे निमंत्रक कृष्णदेव विधाते,राजेंद्र देवडे,एडव्होकेट चंद्रकांत बोंडे,डॉ.श्रीकांत भगत, एडव्होकेट अरविंद सिडाम,वाल्मीक बनकर,अंकुश उपरे यांनी पुस्तक व स्मृतीचिन्ह प्रदान करून केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिव महोत्सव समितीच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले.