अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20%वाढ व सेवा भरतीम वयामध्ये सूट –आदिती तटकरे
नागपूर जयंत साठे – महिला व बाल विभाग महाराष्ट्र अंतर्गत अधिकारी कर्मचारी व अंगणवाडी सेविकांच्या प्रशांनावर मा आदिती ताई तटकरे यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे मा अरुण गाडे, अध्यक्ष काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचे नेतृत्वात महत्वाची बैठक महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र यांचे दालनात पहिला माळा मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झाली.
बैठकीमधे महिला व बाल विभागा अंतर्गत कर्मचाऱ्यांचे सेवविषयक प्रश्न तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, यांचे प्रश्न प्रभावीपणे अरुण गाडे यांनी मांडले.
सामान्य प्रशासन विभागाच्या च्या दि1नोव्हेंबर 2003च्या शासन निर्णयास अनुसरून मुंबई नागरी सेवा वर्गीकरण व सेवा प्रवेश नियम -1939मधील niyam-7मधील तरतुदीनुसार नाम निर्देशद्वारे नियुक्ती साठी वयोमर्यादेची अटीमधून सूट देण्यात आली आहे. करिता महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांची दि 4जून 2021ची अधिसूचना नुसार सेवा भर्ती साठी वयोमर्यादा फक्त 45आहे.20-25वर्षाचा सेवा कालावधी लक्षात घेता वयाची अट शिथिल करून 50करण्यात यावीतसेच महिला व बालविकास विभाग अंतर्गत कर्मचारी अंगणवाडी सेविका या 15-20वर्षांपासून सतत सेवा देत आहे या सर्व अंगणवाडी सेविकांनी ती 45वर्षाची वयोमर्यादा पार केली आहे त्यांना न्याय देण्यासाठी 50वर्षपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात यावी, अशी जोरदार मागणी अरुण गाडेयांनी काष्ट्राईब महासंघाच्या वतीने केली, यावर मंत्री महोदयांनीअंगणवाडी सेविकामधून पर्यवेक्षक या पदावर नियुक्ती झाल्यावर नियमाप्रमाणे 10वर्ष सेवा कालखंड असला पाहिजे त्यास अनुसरून 47वर्षा पर्यंत अट शिथिल करण्यास मान्यता दिली.
अंगणवाडी सेविका गत 20-25वर्षापासुन अतिशय तुटपुंज्या मानधनात सेवा देत आहे, कमित कमी रुपये 20हजार मासिक मानधन देन्यात यावे या मागणीवर 20%मानधनात वाढ करण्यात आली असल्याचे मान्य करण्यात आले,सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारचे अधिनस्त असल्याने त्यावर केंद्र सरकारने मंजुरी दिल्या नंतरच महाराष्ट्र शासन निर्णय घेणार,दिवाळी बोनस ऐवजी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज म्हणून महाराष्ट्र शासन देण्यास राजी असून यावर्षी दिवाळी पूर्वी ही भाऊबीज कर्मचाऱ्यांना मिळणार असे स्पष्ट केले.सर्व मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा देऊन पद निर्मिती करण्यात येईल, अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मॅटरनिटी लिव, मेडिकल लिव मंजुरीला मान्यता देण्यात आली व ग्रॅज्युएटी, याबाबत केंद्र सरकार सोबत चर्चा करून निर्णय घेणार असे आश्वस्त केले.व पेन्शन बाबत सुद्धा योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन मा आदिती ताई तटकरे यांनी दिले,पर्यवेक्षिका यांना वर्ग-2ची पदोन्नती देण्याबाबत चा निर्णय नंतर घेण्याचं आश्वासन दिले.
या प्रसंगी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव मा अनुकुमार यादव भा. प्र. से,उपसचिव वि रा ठाकूर,नागपूर काष्ट्राइब विभागीय अध्यक्ष यशवंत माटे,महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्ष मायाताई परमेश्वर, महाराष्ट्र अंगणवाडी सेविका कर्मचारी संघाच्या अध्यक्षा सुरेखा गायकवाड, काष्ट्राइब अंगणवाडी सेविका संघटना विभागीय अध्यक्षा विशाखा काळबांडे, गडचिरोली जिल्हाध्यक्षा प्रतिमा बांबोळे, ब्राह्मरंभा नकूलवार, हेमलता पाटील, वर्धा जिल्हाध्यक्षा रंजना झाडें व काष्ट्राईब अंगणवाडी सेविका, मदतनीस संघटना चे पदाधिकारी व
शासनाचे अनेक अधिकlरी बैठकीला उपस्थित होते. याप्रसंगी काष्ट्राइब तर्फे मंत्री महोदयांनी बहुतांश मागण्या मंजूर केल्यामुळे त्यांचा मा अरुण गाडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आभार यशवंत माटे यांनी मानले.