25 C
New York
Saturday, July 13, 2024

स्त्रीवादाची सुरुवात घरातून व्हायला हवी – डॉ वर्षा गणगणे

स्त्रीवादाची सुरुवात घरातून व्हायला हवी – डॉ वर्षा गणगणे
सुरेंद्र इखारे वणी :-   ” स्त्रीवादामध्ये स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व समजून तिच्या भावनांचा विचार करणे अपेक्षित आहे. यावर केवळ भाषणे देऊन उपयोग नाही तर ही गोष्ट व्यक्तिगत जीवनापासून आपल्या घरापासून सुरुवात व्हायला हवी. समाजातील या अर्ध्या घटकाची उपेक्षा केल्यास समाजाची वास्तव आणि शाश्वत प्रगती होऊच शकत नाही.” असे विचार डॉ वर्षा गणगणे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगरवाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असलेल्या “माझं गाव माझा वक्ता” या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाच्या २६ व्या पुष्पा मध्ये त्या व्यक्त होत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे, ज्येष्ठ मार्गदर्शक माधव सरपटवार तथा विदर्भ साहित्य संघाचे सदस्य अशोक सोनटक्के उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये माधव सरपटवार यांनी या अभिनव उपक्रमाचे विशिष्ट सांगत आजवरच्या इतिहासाचा मागोवा घेतला.
विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी परिचय करून दिल्यानंतर डॉ. वर्षा गणगणे यांनी स्त्रीवादाचे स्वरूप, भूमिका, इतिहास, समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ दिलीप अलोणे यांनी आजच्या वक्त्यांना घरून मिळालेला पती आणि कुटुंबाचा पाठिंबा तथा त्या भरोशावर त्यांनी साधलेली प्रगती, हा स्त्रीवादाला समाजात मिळत असलेल्या प्रतिष्ठेचा प्रत्यक्ष पुरावा आहे असे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ अभिजित अणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, राम मेंगावर आणि देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News