25 C
New York
Saturday, July 13, 2024

दिवाळी अंकात समाज मनाचं प्रतिबिंब दिसते – गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी

दिवाळी अंकात समाज मनाचं प्रतिबिंब दिसते
– गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी

सुरेंद्र इखारे वणी:-

दर्जेदार दिवाळी अंकांची महाराष्ट्राची परंपरा आहे. दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी पर्वणी असते. या दिवाळी अंकात समाज मनाचं प्रतिबिंब उमटलेले असते. असे प्रतिपादन येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी केले. ते येथील नगर वाचनालयातर्फे दि. 18 नोव्हेंबरला आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत हे होते.

वाचन संस्कृती लोप पावत असल्याबाबत काळजी व्यक्त करून स्वतःच्या मुलीवर केलेले प्रयोग व त्यातून तिला वाचनाची लागलेली आवड उपस्थितांना सांगून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला संस्कारित करण्यासाठी त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वाचनाने विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. विचार केल्याने जबाबदारीची जाणीव होते. त्यातून सुसंस्कारित पिढी निर्माण होते. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी वाचनालयाचे देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News