23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

डॉ आंबेडकर अनुसंधान केंद्र बचावसाठी बसपाचे धरणे

डॉ आंबेडकर अनुसंधान केंद्र बचावसाठी बसपाचे धरणे

नागपूर जयंत साठे – उत्तर नागपुरातील इंदोरा येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र शिफ्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हॉस्पिटल बचाव कृती समितीच्या वतीने आज बसपा नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी रुग्णालया शेजारी असलेल्या धरणे मंडपात दिवसभर धरणे दिली.

आजच्या धरणे मंडपात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, उत्तर नागपूरचे प्रभारी योगेश लांजेवार, अध्यक्ष जगदीश गजभिये, ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव वैद्य व वामन सोमकुवर यांनी दिवसभर धरणे दिली.

धरण्या सोबतच बसपा नेत्यांनी हॉस्पिटल मागील भूमिका व मनुवादी सरकारचे षडयंत्र यावर प्रकाश टाकून सेना-भाजप-राकाँ (शिंदे-फडणवीस-पवार) सरकारचा धिक्कार केला. हे हॉस्पिटल शिफ्ट न करता याच ठिकाणी सरकारने मंजूर केलेले 18 माळ्याचे, 600 बेड चे व रिसर्च सेंटर असलेले रुग्णालयाचे लवकरच भूमिपूजन करून सुरुवात करावी. कोविड काळात रुग्णालयांनीच जनतेला वाचविले मिहान परिसरात आधीच एम्स असताना व अस्तित्वात असलेल्या रुग्णालय परिसरात सामान्य जनता असताना रुग्णालय पळवण्याचा भाजप सरकारचा अट्टाहास का असा बसपा नेत्यांनी सवाल केला.

याप्रसंगी बसपाचे माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, शहर प्रभारी सुमंत गणवीर, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, नितीन वंजारी, सुरेखा डोंगरे, सुनंदा नीतनवरे अश्या बसपाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नागपूर शहराच्या सहाही विधानसभेतून बसपा चे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News