Thursday, October 3, 2024
Google search engine
HomeUncategorizedशिक्षण आयुक्त,पूणे कार्यालयात विमाशिसंघाची शिक्षकांच्या विविध प्रमुख समस्यांबाबत चर्चा

शिक्षण आयुक्त,पूणे कार्यालयात विमाशिसंघाची शिक्षकांच्या विविध प्रमुख समस्यांबाबत चर्चा

 

शिक्षण आयुक्त,पूणे कार्यालयात विमाशिसंघाची
शिक्षकांच्या विविध प्रमुख समस्यांबाबत चर्चा

सुरेन्द्र इखारे वणी :- महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे मिटींगसाठी मुंबईला गेले असल्याने त्यांच्याच कार्यालयातील सहसंचालक दिलीप जगदाळे यांचेसोबत गुरुवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.
त्यामध्ये NPS ची कपात झालेली रक्कम माहे मे २०२३ पासून ऑनलाईन न दिसणे, जिल्हा बदली झालेल्या DCPS धारक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांची DCPS रक्कम NPS मध्ये वळती न होणे, सन २०१७-१८ मधील NMMS स्काॅलरशिप परिक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असणे, सन २०२२ – २३ च्या संचमान्यता हजारो शाळांना प्राप्त न होणे, CBSE शाळांमधील शिक्षकांना वैयक्तिक मान्यता नसणे, मुळ आस्थापनेत जागा उपलब्ध झाल्यानंतर समायोजित शिक्षकास संधी न देता पोर्टलवरुन रिक्त जागा भरणा-या संस्थेवर अंकुश ठेवणे या व इतर अनेक महत्त्वपूर्ण समस्यांचा समावेश आहे.
उपरोक्त समस्यांवर सहसंचालक दिलीप जगदाळे यांचेसोबत प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांची समाधानकारक चर्चा झाली असून त्यांनी सर्व समस्यांचे लेखी निवेदन पाठविण्यास सांगितले आहे. निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासित केले. चर्चेवेळी विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष बरडे यांचेसोबत पूणे येथील कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागरगोजे उपस्थित होते.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments