25 C
New York
Saturday, July 13, 2024

नवभारत साक्षरता अभियानावर वणी तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांचा बहिष्कार

नवभारत साक्षरता अभियानावर वणी तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांचा बहिष्कार

* गटशिक्षणाधिकारी याना निवेदन * 

 सुरेन्द्र इखारे वणी :-  नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणावर बहिष्कार टाकनेबाबतचे निवेदन वणी तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी मा गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर साहेब वणी पंचायत समिती याना दिले. 

          राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुषंगाने 2022-23 ते 2026-27 या कालावधीत शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2022 अन्वये नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी बाबतचे निर्णयानुसार तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले या अनुषंगाने गटसाधन केंद्र पंचायत समिती वणी यांनी वणी तालुक्यातील शिक्षकांना नवभारत साक्षरता प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे पत्र दिल्याने या प्रशिक्षणावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याबाबतचे निवेदन  मा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले व शिक्षक आमदार ऍड किरणभाऊ सरनाईक साहेब  यांच्या शासन परिपत्रकानुसार शाळेत शिक्षक कमतरता तसेच अध्ययन अध्यापन, सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शाळेतील स्वाध्याय,सराव परीक्षा , प्रत्यक्षित परीक्षा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी या अनुषंगाने प्रशिक्षणावर बहिष्कार टाकण्या संदर्भात शासनास निवेदन देण्यात आले आहे या  निवेदनाद्वारे वणी तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी शालेय कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन प्रशिक्षणावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याबाबतचे निवेदन गटशिक्षणाधिकारी याना दिले. यावेळी उपस्थित वणी तालुक्यातील प्रशिक्षणार्थी जी ए आसुटकर, जी एन उईके, एस व्ही सोनटक्के, बी के सिडाम, यु व्ही निंदेकर, व्ही बी खडसे, आर एम राजूरकर, आर पी वैद्य, एस जी मोरे, आर एस गेडाम, एन बी बंड, व्ही पी बुच्चे, सुनील द लखामापुरे , सुनील टोंगे, अरविंद नवघरे, आर जी कुरले, एम ए घोडमारे, ए दि गोंडे, प्रफुल गोलाईत, संजय बोधे, रवी गोंडलावार, नितीन गावंडे, राजेंद्र खिरतकर, निलेश चवले, संजय पिंपळकर, यादव शिखरे, एन पी मडावी, श्रीकांत उलमाले हे होते . 

          

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News