विभक्त पणाविरुद्ध एकतेचा हा लढा आहे – अॅड. बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दहन दिन साजरा
नागपूर ( जयंत साठे ) :-. विभक्तपणा आला की, एकमेकांबद्दल द्वेष, मत्सर निर्माण होतो. म्हणून आपणास हा लढा लढावा लागतो. विभक्तपणा विरुद्ध एकतेचा हा लढा आहे. संसदेवर ज्याचा ताबा त्याचीच व्यवस्था असते. उलथून टाकलेली मनुची सत्ता पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर संसदेवर ताबा मिळवायचा हे धोरण आहे. दबावाचे राजकारण चाललेले आहे. प्रतिक्रतिवाद्यांना या निवडणुका जिंकायच्या आहेत. यासाठी ते वाट्टेल ते करतील. असे प्रतिपादन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ते येथिल कस्तुरचंद पार्कवर आयोजित मनुस्मृती दहन दिनी स्त्री मुक्ती दिनानिमित्त बोलत होते.
ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी जाळून टाकले ती आपण पुन्हा निर्माण होऊ द्यायची नाही. यासाठी झटावे लागेल. आता शासन अनुसूचित जातीकरिता ‘अबकड’ आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याला घाबरण्याचे कारण नाही. काॅंग्रेस राष्ट्रवादींनी जागेचे भूत कमी करावे. पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा हे ठरवणे महत्त्वाचे आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर म्हणाल्या की, भाजपचा दणदणीत पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे . हा वैदिक परंपरेविरुध्दचा लढा गौतम बुद्धांनी सुरू केला. त्यांनंतर संत, म. फुले व त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला मनुस्मृती दहन करून जवळजवळ शंभर वर्षे पूर्ण होत आहे परंतु आजही मनुवाद जिवंत आहे त्याविरुद्ध आपल्याला एकसंघ होऊन संघर्ष करावा लागेल. मनुस्मृती लोकांच्या मनात जागविण्याचे काम आरएसएस करीत आहे. मनुस्मृतीने राजकीय गुलामगिरी निर्माण केली आहे ती आपल्याला नष्ट करावी लागेल. लोकप्रतिनिधी म्हणून स्त्रियांना नगण्य स्थान आहे. हे आरक्षण कोणाच्या घशात जाते ते तपासावे लागेल. संविधानाने आपणास अधिकार दिले असले ते अधिकार आपल्यापर्यंत अजूनही पोहोचले नाही.
यावेळी अशोक सोनोने, प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, निशाताई शेंडे, माजी जि.प.अध्यक्ष (अकोला) शरद गवई, अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगिताताई आढाऊ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना भाग्यश्री रेखामे म्हणाल्या की, जल, जंगल, जमिनीचा लढा आदिवासी समाज लढत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाणी निर्माण होत त्याविरोधात आपण लढा लढला पाहिजे.
अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, भरिप- बमसंच्या काळापासून मनुस्मृती दहन दिन स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा व्हायचा . सत्यशोधक लग्नात विविध प्रथा मोडण्यात आल्या होत्या. तोच धागा पकडून बाबासाहेबांनी स्त्री मुक्ती चा प्रवास संविधानामुळे सुखकर केला.
निर्मलाताई सिडामे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचा लढा सुरू केला त्यामुळे महिलांना आकाशाची उंची कळाली. ऐश्वर्या पेक्षा नीतीने जीवन कंठा असे बाबासाहेबांनी सांगितले. स्रियांनी सक्षम व्हावे यासाठी बाबासाहेब आयुष्यभर झटले. स्रियांचा खराखुरा उध्दारकर्ता केवळ बाबासाहेब आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंवर अन्याय करण्यात आहे. बलत्काऱ्यांना वाचवण्यासाठी भारत माता की जय चे नारे दिले जातात. आज वेगवेगळ्या स्वरूपात मनुस्मृती दिसत आहे. स्त्री शोषणात वाढ झाली आहे. मनिपूर जाळले गेले. महिलांना नग्न करून धिंड काढली जाते ही घटना मनुस्मृतीने डोके वर काढल्याची घटना आहे.
संगीता ताई अढाव, म्हणाल्या की, मनुस्मृती जाळली नसती तर स्त्रीयांची हालत किती खराब झाली असती याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. स्त्रियांच्या सन्मानासाठी केवळ श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर झटतांना दिसतात.
९४ वर्षाच्या वयोवृद्ध लिलाताई चितळे म्हणाल्या की, संविधान हे अविचारी लोकांच्या हातात आले आहे. ज्यांचे स्वातंत्र्य काडीचेही योगदान नव्हते असे लोक आज सत्तेत विराजमान झाले आहे. प्राणप्रिय राज्यघटनेला प्राणप्रणाने लढून जिवंत ठेऊ, बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “नातू व्हावा असा द्रष्टा,ज्याचा दिल्ली घेई धसका” आम्ही कोकणातले मुरूर गावचे माझ्या मावसीचे पती मरण पावल्यावर मावसीचे केशवपन करण्याचे ठरविले होते. तिला पुणेला पोहचविल्यावर ती जगली. अन्यथा ती मेली असती. परंतु आम्ही महारवाड्यातील लिलाताई तायडे यांचेकडे जेवन करीत असे. त्याचा आम्हांला आधार झाला.
अनिता साळवे, मनुस्मृतीच्या गुलामगिरीतून स्त्रियांना मुक्त केले. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गजला खान म्हणाल्या की, पूर्वी बालविवाह,सतिप्रथा, वडिलांच्या संपत्तीत वाटा नसणे, यासह विविध समस्यांना स्त्रीयांना सामोरे जावे लागत असे. आजही हुंडाबळी जात आहे. मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षणावर ते तोंडही उघडत नाही. स्त्री अत्याचारात वाढ होत आहे. ओबीसी व मराठा आरक्षणावर तिन्ही पक्ष नाटक करीत आहे. सन
२०१४ नंतर महिलांवरील व जातीय अत्याचार वाढला आहे.
यावेळी विविध ठराव पारित करण्यात आले.त्यात “मनुस्मृति दहन दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा”, मंगलाताई कांबळे यांनी ठराव क्र. दोन “जयपूर येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात असलेला मनूचा पुतळा त्वरित हटविण्यात यावा”.”महिला आरक्षण बिलात संशोधन करून बहुजन समाजातील महिलांना समान अधिकार व राजकारणात समान वाटा मिळावा.”मनिपुर येथील आदिवासी स्त्रियांना नग्न करून धिंड काढल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी”, “ओबीसींची जात निहाय जनगणना सुरू करा”. या परिषदेत लाखोंची उपस्थिती होती.