वणी शहरातील जैन ले आऊट येथे श्री हरिचैतन्यजी महाराज यांचे किर्तन.
सुरेंद्र इखारे वणी :- शहरातील जैन ले आऊट येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व नागरीक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी निमित्त गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ चे संस्थापक ह भ प श्री हरि चैतन्यजी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 2जानेवारी 2024 ला जयविर हनुमान मंदिराच्या पटांगणावर सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .यामध्ये सकाळी 5 वाजता परिसर स्वच्छता व घटस्थापना, 6 वाजता सामुदायिक ध्यान, 7 वा रामधून व रांगोळी स्पर्धा, 10 वा वक्तृत्व स्पर्धा , दुपारी 1 वा स्थानिक भजन, 4 वा मौन श्रद्धांजली, सायंकाळी 5 वा सामुदायिक प्रार्थना, 5.30 वा राष्ट्रवंदना व सायंकाळी 7 वाजता परमपूज्य स्वामीजी श्री हरी चैतन्यजी महाराज यांचे कीर्तन आहे तेव्हा या अध्यात्मिक व सत्संग कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनि उपस्थित राहावे असे आवाहन अरुण चटप, मधुकर झाडे, पुंडलीक झाडे, सुनिल माथनकर, किशोर थेरे, मनोहर झाडे, मारोती मालेकर, नामदेव तुरानकर, दौलत दुर्गे, नाना बदखल, पुरुषोत्तम पानघाटे. दत्तू, महाकुलकर, विनायक बोबडे, श्रिजित भोयर, प्रज्वल नागतुरे.व समस्त गुरुदेव सेवा मंडळांनी केले आहे.