23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

संजय खाडे यांची पणन महासंघाच्या संचालकपदी निवड

संजय खाडे यांची पणन महासंघाच्या संचालकपदी निवड

सुरेंद्र इखारे वणी :-  सहकार क्षेत्रातील पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली . या पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत एकास एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते या चुरशीच्या निवडणुकीत वसंत जिनिंगचे संचालक संजयभाऊ खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला. 

       पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत 11 मतदारांपैकी 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असता यामध्ये संजयभाऊ खाडे यांना 7मते मिळाली तर प्रतिस्पर्धी शेखर धोटे याना 3 मते मिळाल्याने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला व संचालकपदी निवडून आले. सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे या क्षेत्राला महत्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी संजय खाडे यांनी वसंत जिनिंगच्या निवडणुकीत संचालकपदी विराजमान झाले तसेच पणन महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत संजय खाडे यांनी आपली छाप सोडली असून त्यातही त्यांनी विजय मिळवला व पणन महासंघाचे संचालकपद खेचून आणले त्यामुळे वणी विभागामध्ये संजय खाडे यांच्या निवडीबद्दल कौतुक होत असुन विधानसभेमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांचे मित्र परिवारातील प्रा डॉ शंकरराव वरहाटे, तेजराज बोढे, जयसिंगराव गोहोकार, राजू अंकीतवार, पुरुषोत्तम आवारी, राजेंद्र कोरडे, प्रमोद वासेकर यांनी अभिनंदन केले

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News