23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

वक्तृत्व स्पर्धेत आदर्शचे विद्यार्थी ठरले अव्वल. गुणवंताचा सन्मान सोहळा.

वक्तृत्व स्पर्धेत आदर्शचे विद्यार्थी ठरले अव्वल.
गुणवंताचा सन्मान सोहळा.
सुरेंद्र इखारे वणी :-   श्री गुरुदेव सेवा मंडळ जैन ले आऊट द्वारा आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55, व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त आयोजित ग्रामगीतेवर आधारीत वक्तृत्व स्पर्धेत
आदर्शचे विद्यार्थी अव्वल ठरले असून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून शाळेच्या नावलोकिकात लक्षणीय भर घालणाऱ्या तीन गुणवंतांचा सन्मान प्राचार्य आर एल मोहिते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. त्यात विशाल राठोड, जीनत शेख, तरफिया शेख यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विशाल राठोड यांनी सामुदायिक प्रार्थना ही माणुसकी निर्माण करण्याची शाळा आहे, ग्रामीण संस्कृती राखण्याचा प्रयत्न त्यात जिव्हाळ्याने केला आहे व वेगवेगळ्या कल्पना या प्रार्थनेच्या मुशीत पार गळून जातात असे कणखर विचार व्यक्त केले. संपूर्ण भाषणावर श्रोतूवृंदानी, टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला. सारे मंत्रमुग्ध होऊन दाद देत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एल मोहिते उपस्थित होते. अतिथी म्हणून विकास बलकी, संध्या लोणारे उपस्थित होते. संचालन
ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव गोहोकर, सहसचिव महादेवराव वल्लपकर, प्राचार्य आर एल मोहिते. मार्गदर्शक शिक्षक वैजनाथ खडसे, अजय बदखल, बाबाराव कुचनकर, गणपत ठाकरे, गजानन टेंभूर्डे, रविंद्र उलमाले, यशवंत भोयर, पुनम सिंग, शैलजा झाडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News