प्रा. होमराज पटेलपैक यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त.
सुरेंद्र इखारे वणी :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत संगणक विज्ञान विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या होमराज बाळाभाऊ पटेलपैक यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा द्वारा आचार्य ( पी.एच. डी.)पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी कामठी नागपूर येथील केसरील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सादर केलेल्या “डेव्हलोपमेंट ऑफ वेब कॅचिंग टेक्निक्स फॉर रिडुसिंग लेटन्सी, बॅण्डविड्थ कॉन्झुम्पशन अँड सर्व्हर लोड इन ऑनलाईन वेब एप्लिकेशन” या शोधनिबंधाकरता त्यांना विद्यापीठातील या सर्वोच्च पदवीने अलंकृत करण्यात आले आहे.
विविध वेबसाईटच्या संचालनामध्ये लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणारे हे संशोधन विद्यापीठाद्वारे मान्यता प्राप्त झाल्याने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्यासह संपूर्ण संचालक गण, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रपरिवाराद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या आपल्या संशोधनाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि समाजातील इतर घटकांना देखील उपयोग होईल अशी आशा पटेलपैक यांनी व्यक्त केली.