लोकमान्य टिळक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दत्तक ग्राम नवेगाव येथे संपन्न झाले.
या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमातचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार उपस्थित होते . प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष श्री नरेंद्रजी बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक जी सोनटक्के, संचालक नरेशजी मुनोत, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा सौ वर्षाताई मडावी, कविताताई सोयाम , अमोल पारखे, सौ विद्याताई कालेकर , विलास भाऊ कालेकर, श्री देवेंद्र बच्चेवार हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ .नीलिमा दवणे यांनी सात दिवसीय शिबिरामध्ये केलेल्या कामाचा आढावा घेत १८ शोषखड्डे , दहेगाव नदीवरील बंधारा, ग्राम स्वच्छता, महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, स्मशानभूमीची स्वच्छता वृक्षारोपण इत्यादी श्रमदानाची कार्य तथा तसेच उल्लेखनीय कार्य गावाचे विविधांगी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर केला.
बौद्धिक सत्रांमध्ये श्री प्रमोद वासेकर , विजययजी मुनोत, डॉ. अभिजित अणे, एडवोकेट निलेशजी चौधरी, डॉ. सुवर्णाताई चरपे, डॉ. सपना कलवडे ,डॉ. संदीप केलोडे, गणेशजी केंद्रे, डॉ. श्रीनिवास बिलगुलवार या मान्यवरांनी आपापल्या विषयात मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आकाश महाडोळे व मंगेश गहूकर यांच्या संघाने प्रबोधनात्मक नाटिका, सागर झेप संस्थेमार्फत प्रबोधनात्मक प्रहसन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एकांकिकांच्या सादरीकरणासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवेगाव यांच्या चिमुकल्यांनी विविध कलाकृती सादर केल्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, प्रसनाद्वारे गावकऱ्यांचा मनोरंजन केले. समारोपीय कार्यक्रमात वैष्णवी निखाडे, चंचल मडावी व गौरव नायनवार या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. समृद्धी ताकसांडे, चंचल मडावी, निखिल वाघाडे, दुष्यंत खामनकर , कविता अत्राम यांना उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून गौरविण्यात आले.
आव्हान या आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय शिबिरामध्ये निवड झाल्याबद्दल अंकुश झाडे व कुमारी संजना देवगडे यांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास जुनगरी यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. नीलिमा दवणे यांनी केले.