*वणीच्या विवेकानंद विद्यालयाचे सुयश* प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमात माध्यमिक गटात द्वितीय
सुरेंद्र इखारे वणी :- भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी शासकीय मैदान वणी येथे आयोजित मैदानी सांस्कृतिक कार्यक्रमात विवेकानंद विद्यालयाने सादर केलेल्या विलोभनिय अशा शिवरायांचा
राज्याभिषेक या झाकिचा माध्यमिक गटात दुसरा क्रमांक पटकावला. तसेच प्रेस वेल्फेअर असोसिएशन वणी द्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विवेकानंद विद्यालय वणीचा माध्यमिक गटात तृतीय क्रमांक आला आहे .श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाच्या अध्यक्षा ताराबाई ठावरी ,उपाध्यक्ष प्रा. डॉ शंकरराव व-हाटे ,मंडळाचे सचिव अविनाश ठावरी संचालिक वंदनाताई व-हाटे तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलिप आसकर जेष्ठ शिक्षक गंगाधर गेडाम ‘ नवनाथ नगराळे यांनी विद्यार्थ्यांची कौतुक व अभिनंदन केले . सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व प्रभारी शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले .