23.2 C
New York
Wednesday, July 24, 2024

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारी संपन्न.

लोकमान्य टिळक महाविद्यालयात युवा भरारी संपन्न.

सुरेंद्र इखारे वणी :-विद्यार्थ्यांच्या जीवनात असणाऱ्या सूप्त कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असणाऱ्या तीन दिवसीय युवा भरारी महोत्सवाचे वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक उमापती कुचनकार , सुरेश शुक्ला ,अनिल जयस्वाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .प्रसाद खानझोडे तथा विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे उपस्थित होते.
मान्यवरांनी या व्यासपीठाचा अधिकाधिक लाभ घेत आपल्या कलागुणांना जोपासण्याचे आणि सोबतच आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पुढील विद्यार्थी तथा समूह क्रमशः प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने तथा उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.
पुष्पगुच्छ सजावट – दीप बोबडे ,श्रद्धा चिंतलवार श्रद्धा पचारे ; रांगोळी स्पर्धा- ऋतुजा उपरे, मयुरी मोहितकर, संजना चौधरी, सुषमा डाहुले ; वक्तृत्व स्पर्धा- प्रतीक्षा बोर्डे, गायत्री लोढे, गौरव रामटेके; मेहंदी स्पर्धा- शीतल गहूकर, प्राची उईके, नौशीन खान, राणी नक्षीणे, सुरभी कुचनकर ; वादविवाद- शिफा सिद्धीकी, गार्गी देशपांडे, ओम मुत्युलवार, वैष्णवी निखाडे; पोस्टर प्रेझेंटेशन – कुमकुम झाडे, नौशीन खान, अनिकेत डाहुले ; बुद्धिबळ मुले – वेदांत उपरे, गौरव रामटेके ; मुली- सायली नागपुरे, दिनीम सिद्दिकी; कॅरम मुले- आदित्य मंडवाल, अंकुश झाडे; मुली- पायल सोनटक्के, सोनम सुरपाम, सुगम संगीत – अंकिता भोयर ,तृप्ती जुमळे, लक्ष्मी बेडेकर ; एकल नृत्य – निखिल वाघाडे, गायत्री खाडे ,रोहिणी मोहुर्ले, मयुरी घोडाम; आनंद मेळावा – खुशी ठेवणे, पल्लवी नगराळे आणि दीक्षा गौरी यांची चमू ; समूह नृत्य – प्रणाली मडावी, दुर्गेश मडावी आणि दीक्षा गौरी यांची चमू.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात बीएससी भाग तीन आणि बीकॉम भाग दोन तर मुलींच्या गटामध्ये राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना चमूंनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केले. त्याचप्रमाणे क्रिकेट स्पर्धेत मुलांच्या गटात बीकॉम दोन आणि बीएससी तीन तर मुलींच्या गटात राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख विजेत्या आणि उपविजेत्या ठरल्या. गणेश दुर्गे याला सर्वोत्तम फलंदाज, वैभव बोटरे याला सर्वोत्तम गोलंदाज तर विनय पारधी याला सर्वोत्तम खेळाडू वृत्ती पुरस्काराने गौरवण्यात आले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जुनगरी यांनी तर आभार प्रदर्शन महादेव भुजाडे यांनी केले. युवा भरारी च्या यशस्वीतेसाठी वरील मान्यवरांसह किसन घोगरे, नीलिमा दवणे, उमेश व्यास, गुलशन कुथे, जयंत त्रिवेदी, पंकज सोनटक्के, नितेश चामाटे, संजय बिलोरीया यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थी विकास विभागाच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News