दिगंबर ठाकरे यांचे दुहेरी सुयश !
सुरेंद्र इखारे वणी :- दिग्रस नगर परिषदेच्या नगर विकास विभागातर्फे स्थापना शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात वणी नगर परिषदेचे शिक्षक दिगंबर ठाकरे यांनी एकल आणि युगुल अशा दोन्ही गटात प्रथम क्रमांक प्राप्त करीत दुहेरी यश संपादन केले आहे.
दि.९ ते ११ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान करण्यात आलेल्या या उत्सवाचे उदघाटन आ. संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी विशेष अतिथी पंकज आशिया उपस्थित होते
या महोत्सवात वैयक्तिक प्रकारामध्ये धावणे, चालणे,स्लो सायकलिंग विविध खेळ, रस्सीखेच,वॉलिबॉल,कबड्डी , क्रिकेट इत्यादी क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक विभागात एकल गायन, युगल गायन,एकल नृत्य, समूह नृत्य या विविध प्रकारांमध्ये जवळपास ४५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
सांस्कृतिक प्रकारात एकल गायनात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या दिगंबर ठाकरे यांनी युगल गीतात देखील श्री जयप्रकाश सूर्यवंशी यांच्यासह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे विशेष उल्लेखनीय.
कार्यक्रमाचे बक्षीस वितरण नगरपरिषद दिग्रस च्या मुख्याधिकारी माधुरी मडावी तसेच तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिगंबर ठाकरे यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण यशाबद्दल नगरपरिषदेच्या विविध अधिकाऱ्यांसह विविध गणमान्य नागरिकांच्याद्वारे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे.