भारत बंद समर्थंनार्थ वणी येथे अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचा सहभाग
गटविकास अधिकारी यांना दिले मागण्यांचे निवेदन
सुरेंद्र इखारे वणी—केंद्रातील मोदी सरकारने अनेक शेतकरीविरोधी व कर्मचारी विरोधी कायदे करुन शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावत आहे. महागाईचा उच्चांक गाठला आहे.बेरोजगारी,शिक्षणाचे,सरकारी उद्योगाचे,आरोग्याचे,जमीनीचे, खाजगीकरण सुरु आहे.त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीन झाले आहे.या सर्व प्रश्नाला घेऊन 16 फेब्रू.रोजी संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदचे आवाहन केले होते.त्या पाश्वॆभुमीवर वणी येथे आयटकच्या अंगणवाडी कर्मचारयांनी सुध्दा पं.स.समोर भारत बंद मध्ये सहभागी होऊन अंगणवाडी सेविकांना किमान वेतन द्यावे,पेंशन व मानधनात वाढ करावी या मागण्यचे निवेदन दिले.आजच्या आंदोलनातआयटकचे काॅ.अनिल घाटे,सुनिल गेडाम,अनंता डुंबारे,,वैजंती डुंबारे,अनीता विधाते,प्रेमीला आस्वले,मंदा झाडे,तारा ढवळे,मिरा बोढाले,सुषमा उरकुडे,साधना बलकी,शितल नैताम यांचेसह अंगणवाडी कर्मचारी आयटकचे शेकडाे कार्यकर्ते सहभागी झाले.